मुंबई- यांची माजी सेक्रेटरी असलेल्या यांच्या आयुष्यावर आधारित डॉक्युमेंट्री आज २३ एप्रिल रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे. या डॉक्युमेंट्रीची सह- निर्मिती करण जोहरच्या धर्मेटिक एण्टरटेनमेन्ट यांनी केली आहे. करणने स्वतः या डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात शीला त्यांच्या आयुष्यातील सगळ्या रहस्यमय घटनांचं सत्य स्वतः कथन करणार आहेत. शीला या ओशोंच्या जवळच्या व्यक्तींमधील एक होत्या. त्यांच्यावर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप केला गेला होता. ३४ वर्षांनंतर त्या भारतात परत आल्या आहेत आणि सगळेच त्यांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांबद्दल जाणून घेण्यास उत्सुक आहेत. मां आनंद शीला यांच्या आयुष्यात अनेक अशा घटना घडल्या ज्या इतरांसाठी एक रहस्य बनून राहिल्या. करणने '' चा ट्रेलर शेअर करत लिहिलं, 'तुम्ही त्यांना पाहिलंय, तुम्ही त्यांना ऐकलंय, तुम्ही त्यांच्याबद्दल नक्की ऐकलं असेल, आता त्यांची कथा सांगायला त्या स्वतः आल्या आहेत.' यासोबतच डॉक्युमेंट्रीच्या प्रदर्शनाची तारीखही दिली. २ मिनिटांच्या या ट्रेलरची सुरुवात ओशो रजनीश यांच्या क्लिपने होते. ज्यात ते म्हणतात, 'जे लोक गुन्हा करत नाहीत ते अशा प्रकारे पळून जात नाहीत.' त्यानंतर शीला यांच्या भारतात परतण्याचा व्हिडीओ दाखवला गेला आहे. ट्रेलरमध्ये पुढे दाखवल्याप्रमाणे, शीला यांच्यावर फसवणुकीचा आणि हत्येचा प्रयत्न करण्याचा आरोप लावला गेला. त्यानंतर ओशो रजनीश म्हणतात, 'शीला एक खुनी आहेत. त्यांनी जे पाप केलंय त्याचं ओझं त्या आयुष्यभर सोबत घेऊन जगतील. त्यानंतर शीला त्यांची बाजू मांडत म्हणतात की, हे जग त्यांना ओशोंच्या नजरेतून पाहतंय. सोबतच त्या ओशोंवर प्रेम करत असल्यचादेखील खुलासा करतात. ट्रेलरमध्ये इतकं सगळं पाहिल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. प्रेक्षक शीला यांच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रचंड उत्सुक होते. त्यामुळे 'सर्चिंग फॉर शीला' प्रेक्षकांना पसंत पडेल यात शंका नाही.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dLma64