मुंबई- देशात करोनामुळे भयंकर परिस्थिती आहे. सध्या संपूर्ण देशातील इस्पितळांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू लागला आहे. करोनामुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या रुग्णाला जर ऑक्सिजन नाही मिळाला तर त्याचा मृत्य होऊ शकतो याची जाणीव असल्याने सगळेच ऑक्सिजनसाठी धावपळ करताना दिसत आहेत. अशातच दिल्लीतील एका इस्पितळातील व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल झाला होता. ज्यात इस्पितळाचे सीईओ ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे रडताना दिसत होते. तो व्हिडीओ पाहून बॉलिवूड अभिनेत्री अत्यंत दुःखी झाली. तिने या परिस्थितीत दिल्लीतील डॉक्टरांना मदतीचा हात देऊ केला आहे. दिल्लीतील इस्पितळांसाठी काही ऑक्सिजनच्या सिलेण्डरची सोय करून तिने सोशल मीडियावर ते सिलेण्डर मुंबईहून दिल्लीला नेण्यासाठी मार्ग सुचवण्याचं आवाहन केलं आहे. तिने ट्विटरवर पोस्ट करत लिहिलं, 'हे खूपच हृदयद्रावक आहे. मला खूप वाईट वाटतंय. ऑक्सिजनची कमी प्रत्येक ठिकाणी आहे. मी काही ऑक्सिजन सिलेण्डरची व्यवस्था केली आहे. परंतु, मला हे सिलेण्डर मुंबईहून दिल्लीला पोहोचवण्याचा मार्ग माहीत नाही. कृपया मला काही मार्ग सुचवा.' सुष्मिताच्या या आवाहनावर चाहत्यांनीही तिला प्रतिसाद दिला. चाहत्यांनी सुष्मिताला त्यांच्या परीने अनेक मार्ग सुचवले जेणेकरून हे सिलेण्डर मुंबईतून दिल्लीला पोहोचवले जाऊ शकतील. परंतु, अशा परिस्थितीतही एका युझरने सुष्मिताला मुंबईच्या परिस्थितीवर प्रश्न विचारला आहे. युझरने लिहिलं, 'मुंबईत देखील कित्येक रुग्ण सापडत आहेत मग तुम्ही मुंबईतून दिल्लीत ऑक्सिजन सिलेण्डर का नेत आहात?' यावर सुष्मितानेही त्याला उत्तर देत लिहिलं, 'कारण सध्या मुंबईकडे मुबलक असा ऑक्सिजन साठा आहे.' काही काळाने त्या इस्पितळातील डॉक्टरांचा ऑक्सिजनची व्यवस्था झाल्याचा व्हिडिओदेखील आला होता.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QQcAWG