Full Width(True/False)

'वेड लागलं का?' बटण न लावता घातलेल्या शर्टवरुन अंकिता ट्रोल

मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अंकिता सातत्यानं सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसते. अंकितानं नुकतंच एक नवीन फोटोशूट केलं आहे. ज्यातील काही फोटो तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ज्यातील तिच्या स्लिम ट्रान्सफरमेशनची चर्चा सोशल मीडियावर होताना दिसत आहे. पण यासोबतच तिच्या या फोटोंमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल सुद्धा केलं जात आहे. अंकितानं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिचं ग्लॅमरस ट्रान्सफॉरमेशन दिसत आहे. पण या फोटोंमुळे अंकिता पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोलिंगची शिकार झाली आहे. अनेकांनी या फोटोंवरून अंकितावर कमेंट केल्या आहेत. कारण तिच्या या फोटोंमध्ये तिनं शर्टची बटण न लावलेली नाहीत. यावरूनच तिला युझरनी कपडे कसे घालावेत याचं ज्ञान द्यायला सुरुवात केली आहे. एक युझरनं लिहिलं, 'दिवसातून ७५ फोटो पोस्ट करू नको.' तर दुसऱ्या युझरनं लिहिलं, 'असं वाटतंय की तू वेडी झाली आहेस.' अन्य एका युझरनं लिहिलं, 'म्हातारी बाईची नाटकं, भूतनी कुठली.' अंकिता लोखंडे सोशल मीडियावर ट्रोल करणाऱ्यांमध्ये सुशांतसिंह राजपूतच्या चाहत्यांचा समावेश आहे. सुशांतच्या चाहत्यांनी अंकिताच्या अशा कपडे घातण्यावर नाराजी व्यक्त केली आहे. सुशांतच्या एका चाहत्यानं लिहिलं, 'असं करू नको सुशांत स्वर्गातून पाहत असेल' दुसऱ्या एका चाहत्यानं लिहिलं, 'आता सुशांतला न्याय मिळाला का?' अन्य एका युझरनं लिहिलं, 'सुशांतच्या निधनानंतर काहीच काम नाहिये का? वेडी झाली आहेस का? की आता कोणी विचारत नाही.' सुशांतसिंह राजपूतनं मागच्या वर्षी आत्महत्या केली होती. त्यानंतर सोशल मीडियावर अंकिता लोखंडेला सातत्यानं ट्रोल केलं. काहींनी तर अंकिताला हे सुद्धा म्हटलं की, जर तिने सुशांतला सोडलं नसतं तर तो आज जिवंत असता. त्यानंतर अनेक वेळा अंकिता सोशल मीडियावर ट्रोल होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sKOYjw