Full Width(True/False)

माधुरीच्या जबरदस्त डान्ससमोर नोरा पडली फिकी, चाहते म्हणाले

मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. तिच्या सौंदर्याने तिने चाहत्यांवर भुरळ घातली आहे. माधुरीने अनेक दशकं तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आजही तिची जादू मुळीच कमी झालेली नाही. माधुरीच्या यशामध्ये तिच्या नृत्याचादेखील फार मोठा वाटा होता. आजही माधुरीने तिच्या नृत्याने भल्याभल्यांना वेड लावलं आहे. तिच्या समोर बॉलिवूडची लोकप्रिय नृत्यांगना देखील फिकी पडली. कलर्स वाहिनीवरील '' च्या मंचावर माधुरीने नोरासोबत नृत्य केलं. तिचं नृत्य पाहून चाहते पुन्हा एकदा माधुरीच्या प्रेमात पडले आहेत. 'डान्स दिवाने ३' च्या मंचावरचा हा व्हिडीओ वाहिनीने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्यात माधुरी आणि नोरा वेगवेगळ्या गाण्यांवर नृत्य करत एकमेकांशी स्पर्धा करताना दिसत आहेत. सुरुवातीला नोरा माधुरीच्या 'खलनायक' या चित्रपटातील 'चोली के पीछे' गाण्यावर नृत्य करताना दिसतेय. तिला पाहून अनेकजण तिचं कौतुक करतात. त्यानंतर माधुरी तिला जोरदार टक्कर देताना दिसते. माधुरी 'जाबाज' चित्रपटातील 'एक तो कम जिंदगानी' या गाण्यावर जबरदस्त नृत्य करताना दिसते. तिचं नृत्य पाहून तिथे उपस्थित सगळेच अवाक होतात. माधुरीच्या नृत्याचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होत आहे. नृत्याने चाहत्यांना पुन्हा एकदा माधुरीची भुरळ पडली आहे. अनेकांनी माधुरीच्या नृत्याचं कौतुक करत नोराला माधुरीकडून नृत्याचे धडे घ्यायला सांगितले आहेत. त्या व्हिडीओवरही निरनिराळ्या कमेंट आल्या आहेत. एका युझरने लिहिलं, 'माधुरी तर नेहमीच बेस्ट असते.' तर दुसऱ्याने लिहिलं, 'माधुरी तर माधुरी आहे.' आणखी एका युझरने लिहिलं, 'गुरू नेहमीच गुरू असतो, माधुरी दीक्षित रॉक्स.' एका युझरने लिहिलं, 'नोराला माधुरीचं गाणं शोभत नाही.' तर दुसऱ्या युझरने लिहिलं, 'माधुरीच्या समोर नोरा काहीच नाही.' चाहते 'डान्स दिवाने ३' च्या या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gwhHGc