मुंबई : याने नुकतीच नवी कोरी गाडी घेतली आहे. या गाडीतून त्याने मुंबईच्या रस्त्यांवरून फेरफटका मारला असता सर्वांच्या नजरा त्याच्या या गाडीवरच खिळल्या होत्या. तेव्हापासून सोशल मीडियावर अर्जुनच्या या गाडीची चर्चा आहे. अर्जुनने नेमकी कोणती गाडी घेतली आणि त्याची किंमत काय आहे हे जाणून घेण्याची तुम्हाला नक्कीच उत्सुकता असेल. अर्जुनने स्वतःसाठी लँड रोवर डिफेंडर ही गाडी घेतली आहे. या गाडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अर्जुन कपूरच्या घराबाहेर उभी असलेली गाडी पाहून प्रत्येकालाच ती आवडली. अर्जुनच्या या गाडीची किंमत १ कोटींहून अधिक आहे. याआधी अर्जुनच्या काकाने अनिल कपूर यांनीही मर्सिडीज बेन्ज गाडी घेतली होती. अनिल यांनी पत्नी सुनीता कपूर यांना ही गाडी वाढदिवसाची भेट म्हणून दिली होती. अलिकडेच कार्तिक आर्यननेदेखील लॅम्बोर्गिनी उरूस गाडी घेतली. त्यानेही या गाडीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. इतकेच नाही तर त्याचा गाडीला नमस्कार करत असल्याचे फोटो आणि व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दरम्यान, सैफ अली खान यानेही या गाडीची टेस्ट ड्राइव्ह घेतली होती. परंतु अद्याप त्याने गाडी विकत घेतली नाही. अर्जुनच्या कामाबद्दल सांगायचे तर तो 'संदीप और पिंकी फरार' या सिनेमात दिसला होता. या सिनेमात त्याच्यासोबत अभिनेत्री परिणीता चोप्रा होती. त्यावनंतर अद्याप त्याचा कोणताही सिनेमा प्रदर्शित झालेले नाही. दरम्यान, अर्जुन कपूरच्या नावाची चर्चा त्याच्या कामापेक्षा सोबत असलेल्या नात्यामुळेच जास्त होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3teOYJv