Full Width(True/False)

ग्लॅमरस शनाया कपूर देतेय सोनम- जान्हवीला टक्कर, पाहा फोटो

मुंबई- बॉलिवूड अभिनेता संजय कपूर आणि महीप कपूर यांची मुलगी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. शनाया सोशल मीडियावर सक्रिय असते. तिने भलेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही परंतु, सोशल मीडियावर तिच्या फोटोंची जोरदार चर्चा आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आधीच चाहत्यांपर्यंत पोहोचली आहे. ती नेहमीच तिचे निरनिराळे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. चाहत्यांना तर तिच्या फोटोंनी अक्षरशः वेड लावलं आहे. तिचे फोटो पाहून चाहत्यांना सोनम आणि जान्हवीचा देखील विसर पडला आहे. शनाया तिचे ग्लॅमरस आणि बोल्ड फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. नुकतेच तिने काही बोल्ड फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आणि बघता बघता तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या फोटोंमध्ये शनायाने काळ्या रंगाची मोनोकिनी घातली आहे. त्यासोबाबत तिने हटके दिसण्यासाठी मोठ्या साइजचं जॅकेट घातलं आहे. तिचा हा लुक खूप आकर्षक वाटत आहे. ती या फोटोंमध्ये अतिशय सुंदर दिसत आहे. शनायाचे हे फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहेत. तिचे हे फोटो पाहून ग्लॅमरच्या बाबतीत ती तिच्या चुलत बहिणींना म्हणजेच सोनम आणि जान्हवी कपूरला जोरदार टक्कर देणार हे सिद्ध झालं आहे. चाहत्यांनी तिच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव केला आहे. फोटोला भरपूर लाइक आणि कमेंटदेखील मिळाले आहेत. अनेक चाहत्यांनी तिच्या सौंदर्याचं कौतुक करत तिला हृदयाचा इमोजी पाठवला आहे. चित्रपटात पदार्पण करण्यापूर्वीच शनाया चाहत्यांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. तिच्या फोटोसोबतच तिचं नृत्यदेखील चाहत्यांना प्रचंड पसंत पडतं. शनायाने जान्हवीच्या 'गुंजन सक्सेना' चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी पार पाडली होती. याशिवाय ती नेटफ्लिक्सची वेबसीरिज फॅब्युलस लाइफ ऑफ बॉलिवूड वाइफ' मध्ये काम केलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3uIuo4V