Full Width(True/False)

जवळचा मित्र गमावल्यावर मिलिंद सोमण झाला हळवा, म्हणाला..

मुंबई- बॉलिवूड अभिनेते आणि मॉडेल सोशल मीडियावर चर्चेत आहेत. वयाच्या ५५ व्या वर्षीदेखील अत्यंत फिट असल्यामुळे तरुणांसाठी ते आदर्श आहेत. देशभरात पसरलेल्या महामारीमुळे परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. त्यात अनेक बॉलिवूड कलाकारांनाही करोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी मिलिंद यांनादेखील करोनाची लागण झाली होती. इच्छाशक्तीच्या जोरावर आणि योग्य औषधोपचाराने त्यांनी करोनावर मात केली. परंतु, एका जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मिलिंद मात्र थोडे हळवे झाले आहेत. मिलिंद यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. आपल्या जवळच्या मित्राला गमावल्यानंतर मिलिंदने सगळ्यांना घरात राहण्याचं आवाहन केलं. आपला एक विचारमग्न फोटो शेअर करत त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं, 'काही दिवसांपूर्वी माझ्या एका जवळच्या मित्राचा मृत्यू झाला ज्याचं वय फक्त ४० वर्ष होतं. ही गोष्ट माझ्यासाठी खूप धक्कादायक होती. खूप लोक मला विचारतात की, मी इतका फिट असूनही मला करोना कसा झाला. मी म्हणतो की, तुम्ही फिट आहात आणि तुमचं आरोग्य चांगलं आहे तर तुम्हाला या व्हायरससोबत लढण्याची ताकद मिळेल. पण हे तुम्हाला इन्फेक्शन होण्यापासून रोखू शकत नाही. मला लोक विचारतात की, तुम्ही आरोग्याबद्दल इतकं म्हणता पण काही लोक असे आहेत ज्यांच्याकडे खाण्यासाठी अन्न नाही. त्यांनी काय करायचं?' या प्रश्नाला उत्तर देत मिलिंदने लिहिलं, 'मला वाटतं जर तुमच्याकडे आरोग्य नाही तर बाकीच्या सगळ्या गोष्टी दुय्यम ठरतात. तुमचं आरोग्य योग्य ठेवण्यासाठी सध्या घरात राहणं आवश्यक आहे. मी तुम्हाला विनंती करतो की घरी राहा आणि सुरक्षित राहा.' या पोस्टमध्ये मिलिंद सोमण यां पुन्हा एकदा आरोग्याचं महत्व पटवून दिलं आहे. फक्त मिलिंदचं नाही तर त्यांची आई आणि पत्नीही आरोग्याबाबतीत सजग आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2QVSpXA