Full Width(True/False)

परिस्थिती गंभीर, मराठी सिनेसृष्टीतील कलाकार खंबीर; अशी करतायत गरजूंना मदत

रामेश्वर जगदाळे ऑक्सिजन बेड, औषधं, प्लाझ्मा यांसाख्या अनेक गोष्टींची गरज साऱ्या महाराष्ट्रातील तसंच देशातील नागरिकांना आहे. या कठीण काळात वेळोवेळी आपल्या कलेद्वारे, अभिनयाद्वारे माय बाप प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करणारे मराठी सिनेसृष्टीतील कलाकार पुढे सरसावले आहेत. चाहत्यांबरोबर संवाद साधण्यासाठी, आपलं काम प्रेक्षकांना दाखवण्यासाठी प्रभावीपणे सोशल मीडियाचा वापर करणारे कलाकार संकटाच्या काळातसुद्धा त्याच मार्गानं अनेकांची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करताहेत. 'तुला पहाते रे' या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेला चेहरा म्हणजे . सध्या ती कोविड संदर्भात योग्य ती माहिती पुरवण्यासाठी काम करतेय. 'माणुसकीच्या नात्यानं प्रत्येकाला मदत करणं गरजेचं आहे. चाहत्यांचा एक मोठा वर्ग आपल्याला फॉलो करत असतो. त्यामुळे त्यांच्यापर्यंत गरजू लोकांची माहिती गेली आणि कोणाला मदत झाली तरी त्याचं समाधान आहे. या भावनेने सध्या मी माहिती पोहोचवतेय', असं तिनं सांगितलं. आधी स्वतः करोनावर मात करून आता अनेकांना या संकटाशी लढण्याचं बळ देण्याचं काम प्रिया बापट करतेय. याबद्दल प्रियानं सांगितलं, 'करोनाच्या काळात कोणते व्यायाम करावे, कसे करावे हेही मी सांगतेय. मी देत असलेली माहिती योग्य आहे का याची मी खात्री करून घेत असते. मला मिळालेले फोन नंबर वेगवेगळ्या माध्यमांवर आधी तपासून मगच मी ते शेअर करते.' नागरिकांना लागणारी योग्य माहिती तसंच अडचणीत असणारे रुग्ण यांची माहिती आपण आपल्या सोशल मीडियावर शेअर करून प्रेक्षकांसाठी असलेली जबाबदारी पूर्ण करू शकतो असं सिद्धार्थ जाधवला वाटतं. 'मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय यंत्रणा हवी आहे; मात्र माहितीचा अभाव आहे. त्याचीच सध्या जास्त गरज आहे. योग्य माहितीमुळे संबंधित व्यक्तीची समस्या दूर होऊ शकते. त्यामुळे माहिती शेअर करा आणि घरी बसूनच या लढाईत सहभाग नोंदवा', असं तो म्हणाला. तर सोशल मीडियाचं महत्त्व सांगत सिद्धार्थ मेननं म्हणाला, 'करोनाच्या काळात आपण तंत्रज्ञानाचा वापर करून एकमेकांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे. सध्या आधार देण्याचं माध्यम सोशल मीडिया आहे. झालेल्या रुग्णाला फोन, मेसेजद्वारे सतत आधार देणं हे सोशल मीडियामुळे शक्य होऊ शकतं.' घरी बसून मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या स्वत:ला सकारात्मक कसे ठेवाल याच्या काही टिप्स सोशल मीडियावर शेअर करतेय. त्याविषयी ती म्हणाली, 'करोनाविषयक माहितीसह शेतकऱ्यांच्या गोष्टी, त्यांची उत्पादने याची माहितीसुद्धा मी चाहत्यांपर्यंत पोहोचवतेय. दर दिवशी अनेक मेसेज येतात. त्याची योग्य पडताळणी करून मी ते शेअर करते.' तर नंदिता धुरीनं सांगितलं, 'आवश्यक गोष्टी कुठे, कशा मिळत आहेत याविषयीची माहिती गरजू लोकांना समजणं गरजेचं आहे. त्यामुळे शक्य होईल तेवढी माहिती त्यांना दिली पाहिजे.' या कलाकारांसह इतरही काही कलाकार सोशल मीडियावरून करोनाविषयी माहिती देण्याचं काम करताहेत. स्वप्निल जोशी, मिथिला पालकर, रसिका सुनिल हे कलाकारदेखील सध्या सोशल मीडियाद्वारे अनके गरजू लोकांना मदत करताहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xrofMD