Full Width(True/False)

३० हजार कुटुंबाला १ कोटींची मदत; अर्जुन- अंशुलाचा मदतीचा हात

मुंबई : त्याच्या 'सरदार का ग्रँडसन' सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. हे करत असताना तो आणि त्याची बहिण अंशुला कोविड संकटामधील गरजू कुटुंबाना मदत करत आहे. इतकेच नाही तर गरीब लोकांना अन्न वाटप आणि त्यांना सुरक्षा कीट पोहोचवण्याचे कामही ते करत आहे. अर्जुन आणि त्याची बहिण यांनी ऑनलाइन सेलिब्रिटी फंड रायझिंग प्लॅटफॉर्मची स्थापना केली आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दोघेजण देशभरातून मदत गोळा करण्याचे काम करत आहेत. तसेच ही मदत देशातील जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कामही त्यांनी हाती घेतले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अर्जुन आणि अंशुला यांनी आपल्या चाहत्यांच्या मदतीने १ कोटी रुपये जमा केले असून त्या माध्यमातून ३० हजारांहून जास्त कुटुंबांना मदत केली आहे. अर्जुनने सांगितले, 'करोनामुळे आपण प्रत्येकजण दुःखाच्या समुद्रात अडकलो आहेत. या कठीण परिस्थितीमध्ये प्रत्येकाने आपापल्यापरिने जास्तीत जास्त लोकांना मदत करायला हवी. मी आणि अंशुला मिळून शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्हाला एक समाधान मिळत आहे की, या माध्यमातून देशभरातील गरजू लोकांना मदत केली जात आहे. यानंतरही ही मदत सातत्याने सुरूच ठेवणार आहोत.' अर्जुन आणि अंशुलाचे वडील बोनी कपूर यांनाही आपल्या मुलांच्या या कामगिरीचा अभिमान आहे. महिन्याच्या किराणा सामानापासून ते ताजे खाणे देण्यापर्यंत तसेच प्रवासी मजुरांना आर्थिक मदत करण्यापासून ते कोविड- १९ प्रसार रोखण्यासाठी हायजीन कीट देण्यापर्यंतची सगळी मदत जास्तीत जास्त लोकांपर्यंत देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे अर्जुनने सांगितले. या जीवघेण्या संकटाविरुद्ध लढण्यासाठी आणि त्याच्या विनाशापासून वाचण्यासाठी आमच्याकडून थोडीफार मदत केली जाईल, अशी अपेक्षा ही त्याने व्यक्त केली आहे. या कठीण प्रसंगामध्ये एकमेकांना मदत करून त्यातून मिळणारे समाधान खूप मोठे असल्याचे मत अर्जुनने व्यक्त केले आहे. तो पुढे म्हणाला, आतापर्यंत मी कमावलेले पैसे यामध्ये दिले आहेत. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अतिशय गरजू लोकांना मदत केली जाईल आणि त्यांच्या कठीण काळात आम्ही त्यांना उपयोगी पडत आहोत. हाच या मागचा महत्त्वाचे हेतू आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eHtBKZ