मुंबई- बॉलिवूड अभिनेता याला चित्रीकरणादरम्यान लॉकडाउनचे नियम तोडल्याप्रकरणी बुधवारी २८ एप्रिल रोजी पंजाबमधील लुधियाना येथून अटक करण्यात आली आहे. जिमी त्याच्या '' वेबसीरिजच्या दुसऱ्या सीजनचं चित्रीकरण करत होता. चित्रीकरणादरम्यान त्याने आणि तिथे उपस्थित टीमने सोशल डिस्टंसिन्गसोबत इतर अनेक नियम मोडले आहेत. याआधी मंगळवारी देखील चित्रीकरणादरम्यान नियम मोडल्यानं त्यांना दंड भरावा लागला होता. पंजाब मधील लुधियाना येथील आर्य विद्यालयात एक एक करून अनेक चारचाकी गाड्या आणल्या गेल्या. जेव्हा आत पाहिलं गेलं तेव्हा तिथे एका पंजाबी चित्रपटाचं चित्रीकरण सुरू असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. आर्य विद्यालयाला सेशन कोर्टाचं रूप दिलं गेलं होतं. गर्दी न करण्याचा नियम असतानादेखील एकाच ठिकाणी प्रचंड गर्दी करण्यात आली होती. परवानगीपेक्षा जास्त माणसं तिथे उपस्थित होती. पोलिसांना या गोष्टीची माहिती मिळताच त्यांनी त्या ठिकाणी धाड टाकत सोशल डिस्टंसिन्गचं पालन ना करणाऱ्या दिग्दर्शकासह आणखी दोन व्यक्तींवर कारवाई केली. इतकंच नाही तर वेबसीरिजच्या चित्रीकरणाची परवानगी संध्याकाळी सहा वाजेपर्यंतची असताना रात्री आठ वाजेपर्यत चित्रीकरण सुरू ठेवण्यात आलं होतं. पंजाबमध्ये करोनामुळे नाइट कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. त्यानुसार, संध्याकाळी सहा पासून ते सकाळी पाच पर्यंत चित्रीकरणाला परवानगी नाही. परंतु, लॉकडाउनचे नियम पायदळी तुडवत तिथे चित्रीकरण सुरू होतं. जेव्हा पोलीस तिथे पोहोचले तेव्हा कोर्टातील सीनचं चित्रीकरण करण्यात येत होतं. तर तिथे उपस्थित अनेकांनी तोंडाला मास्कदेखील लावले नव्हते. पोलिसांना पाहताच त्यांनी आपापले चेहरे रुमालांनी झाकले.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3e0qIWu