Full Width(True/False)

हृतिक रोशनच्या गाण्यावर आशाताई थिरकल्या...! चाहतेही हैराण

मुंबई : यांच्या सुमधूर आवाजाचे कोट्यवधी चाहते आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून आशा भोसले यांनी संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य केले आहे आणि आजही त्यांचा आवाज तितकाच सुमधूर आहे. आशा भोसले यांना गाण्याबरोबरच नृत्याचेही अंग आहे. ८८ व्या वर्षी आशा भोसले यांनी 'एक पल का जिना' या गाण्यावर अशा काही थिरकल्या आहेत की ते पाहताना सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आशाताईंच्या नृत्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आशा भोसले याच्या 'कहो ना प्यार है' सिनेमातील 'एक पल का जीना...' गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आशाताई अगदी सेम टू सेम हृतिकने डान्स केला होता तसाच आशाताईंनी केला. हा व्हिडीओ एका कॉन्सर्टमधला आहे. आशाताईंचा हा अनोखा अंदाज पाहून उपस्थित सारेच थक्क झाले होते. आशाताईंच्या या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. सेलिब्रिटींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. आशाताईंचे नृत्य कौशल्या पाहून सर्वचजण थक्क झाले आहेत. एका चाहत्याने लिहिले, 'त्या डान्स करताना सुंदर दिसतात. त्यांनी डान्स करत राहिलं पाहिजे.' याही वयामध्ये आशा भोसले यांचा उत्साह पाहून साऱ्यांनीच त्यांचे कौतुक केले आहे. अनेकांनी त्यांना 'रॉकस्टार' असेही म्हटले आहे. अनेकांचा अजूनही विश्वास बसत नाही की, आशा भोसले या अशा पद्धतीने नृत्य करू शकतात. आशा भोसले यांच्या नावावर आहेत अनेक विक्रम आशा भोसले यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ मध्ये झाला आहे. त्या नऊ वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले. त्यानंतर आशा भोसले त्यांची मोठी बहिण लता मंगेशकर आणि अन्य भावंडासह मुंबईला आल्या. कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी लता आणि आशा यांनी पार्श्वगायनाला सुरुवात केली. आतापर्यंत आशा भोसले यांनी हजारो गाणी गायली आहेत. आशा भोसले यांनी पॉप गाण्यांपासून गझल, भजन, भारतीय शास्त्रीय संगीत, कव्वाली अशा विविध प्रकारची गाणी गायली आहेत. संगीताच्या क्षेत्रामध्ये सर्वात जास्त गाणी गाण्याचा रेकॉर्ड आशा भोसले यांच्या नावावर असून त्यांचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे. २००० मध्ये आशाताईंना दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3avZ8y8