Full Width(True/False)

मराठी मालिकांमधील कलाकार गोवा आणि दमणमध्ये; अशी आहे शूटिंग आणि राहण्याची व्यवस्था

सगळ्याची उत्तम सोयमालिकेचं चित्रीकरण सुरू ठेवणं गरजेचं होतं कारण यावर अनेकांचं उत्पन्न अवलंबून आहे. राहण्याच्या सोय ते चित्रीकरण अशी सगळ्याची उत्तम सोय इथे आहे. टीममधल्या चाचणी निगेटीव्ह आलेल्यांनाच आम्ही चित्रीकरणासाठी घेऊन आलो आहोत. त्यामुळे टीम कमी झाली आहे. सगळेच सगळी काम करत आहोत. मालिकेतलं पूर्वीचं घर इथे साकारण्यासाठी सगळ्यांचीच मदत झाली आहे. - गौतमी देशपांडे, माझा होशील ना (सिल्वासा) ...पण काम करायला हवंदमणला चित्रीकरण करताना स्वतःबरोबरच आम्ही इतरांचीही काळजी घेत आहोत. मुंबईतली चित्रीकरणाची ठिकाणं सोयीची असतात. पण इथे तसं नाही. तरीही काम करणं गरजेचं आहे. टीम कमी असल्यामुळे प्रत्येक जण स्वतःची कामं स्वतःच करत आहे. सोयीच्या वातावरणात नसलो तरी समजून उमजून काम करणं भाग आहे. - नंदिता पाटकर, सहकुटुंब सहपरिवार (दमण) चर्चा आणि गप्पाआमच्याबरोबर आणखी एका मालिकेची टीमसुद्धा इथेच आहे. त्यामुळे कामाव्यतिरिक्त एकत्र बसणं, चर्चा करणं सुरू असतं. मालिकेच्या युनिटनं मनोरंजनाची साधनंदेखील उपलब्ध करून दिली आहेत. त्यामुळे सगळ्यांबरोबर खेळायला आणि वेळ घालवायला मजा येते. करोनाचं संकट लवकर संपू दे आणि पुन्हा सर्व सुरळीत सुरु होऊ दे; अशी आम्ही सर्वच इच्छा करतोय. - हरिश दुधाडे, तू सौभाग्यवती हो (गोवा) काळजी घेतोयआमच्या मालिकेचं चित्रीकरण राजकोटमध्ये सुरू आहे. इथल्या एका पॅलेसमध्ये प्रत्येकालाच वेगळी खोली दिलीय. नवीन जागा, सेट असल्यानं रूळायला थोडा वेळ लागला; पण आता सगळ्या नियमांचं पालन करत चित्रीकरण सुरू झालंय. इथे उन्हाळा खूप जाणवू लागलाय. पण आम्ही सगळेच स्वतःची खूप काळजी घेतोय. सेटच्या सभोवताली निसर्गसौंदर्य बघायला मिळतं. आम्ही इथे पिसारा फुलवणारे मोरसुद्धा बघितले आहेत. - समृद्धी केळकर, फुलाला सुगंध मातीचा, (राजकोट) जबाबदारी वाढली आहेसध्या आम्ही दमणमधल्या एका रिसॉर्टमध्ये चित्रीकरण करतोय. घरची, घरच्यांची निश्चितच खूप आठवण येतेय. पण या कठीण परिस्थितीमध्येही चित्रीकरण करायला मिळतंय, ही महत्त्वाची गोष्ट आहे. कमी युनिट मध्ये काम सुरू असलं तरी प्रत्येक जण जबाबदारीनं काम करतोय. सगळे नियम सांभाळत काम करणं ही खरंच मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे एकमेकांना सांभाळून काम सुरू आहे. - , , (दमण) नियमांचं काटेकोरपणे पालननवीन ठिकाणी चित्रीकरण करण्याचा अनुभव छान आहे. जयपूरमध्ये वाहिनीच्याच स्टुडिओमध्ये चित्रीकरण सुरू आहे. कलाकार, युनिट सगळ्यांना वेगवेगळ्या रूममध्ये ठेवण्यात आलं आहे. सरकारनं घालून दिलेले सगळे नियम काटेकोरपणे पाळले जाताहेत. - भाऊ कदम, चला हवा येऊ द्या, (जयपूर) संकलन: सुरज कांबळे, संपदा जोशी, संजना पाटील


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gQSAOH