मुंबई- बॉलिवूडचे दिग्गज कलाकार आणि करिना कपूरचे वडील यांना करोनाची लागण झाली असून त्यांना बुधवारी रात्री मुंबईतील कोकिलाबेन अंबानी इस्पितळात भरती करण्यात आलं होतं. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं आहे. रणधीर यांनी स्वतःच्या प्रकृतीची माहिती देत त्यांची तब्येत स्थिर असल्याचं म्हटलं आहे. चिंतेचं कारण नाही एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, रणधीर यांनी स्वतः त्यांच्या तब्येतीविषयी सांगताना म्हटलं की, त्यांची तब्येत आता ठीक आहे. चिंतेचं काहीही कारण नाही. काही चाचण्या करण्यासाठी त्यांना आयसीयूमध्ये नेण्यात आलं आहे. हाता- पायाला मुंग्या येऊ लागल्याने आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांनी चाचणी करून घेतली होती. ती पॉझिटिव्ह आल्याने बुधवारी रात्री त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आलं. इतकंच नाही तर त्यांच्या टीममधील आणखी पाच कर्मचाऱ्यांनादेखील करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर देखील इस्पितळात उपचार सुरू आहेत. टिना अंबानी यांचे मानले आभार रणधीर यांनी म्हटलं, 'माझ्या काही चाचण्या करण्यासाठी आयसीयूमध्ये नेलं जातंय. इस्पितळात डॉक्टर्स माझी खूप काळजी घेत आहेत. मी टिना अंबानी यांचे आभार मानतो. डॉक्टर्स नेहमी माझ्या आजूबाजूला असतात. सगळं ठीक आहे. हा मला थोडासा ताप आहे. कालही होता. पण मला श्वास घ्यायला कोणतीही अडचण वाटत नाही. मला ऑक्सिजन सपोर्टची गरज नाही. रणधीर यांच्या दोन्ही भावंडांचं म्हणजेच ऋषी कपूर आणि राजीव कपूर यांचं यापूर्वीच निधन झालं असल्याने चाहते त्यांच्यासाठी चिंता व्यक्त करत आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3u5Twm7