मुंबई : अभिनेता सिनेमा निवडीबाबत अतिशय चोखंदळ आहे. त्यामुळे तो काम करत असलेल्या सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. अजय देवगण आता सिनेमांसोबतच वेब सीरिजमध्येही दिसणार आहे. यांची वेब सीरिज '' मध्ये मुख्य भूमिकेत काम करणार असल्याची घोषणा अजयने अलिकडेच केली आहे. या वेब सीरिजमध्ये काम करण्यासाठी म्हणून त्याने दोन सिनेमांना नकार दिला आहे. या वेबसीरिजसाठी त्याने ज्या तारखा दिल्या आहेत त्यामुळे त्याच्याकडे असलेल्या दोन मोठ्या बॅनरच्या सिनेमांचे समीकरण गंडले गेले. अर्थात या दोन्ही सिनेमांच्या कामाला अद्याप सुरुवातही झालेली नाही. यातील एका सिनेमात अजयने स्वतःहून काम करण्यास नकार दिला आहे. तर दुसऱ्या सिनेमाबाबत संदिग्धता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अद्याप निर्णय न झालेल्या सिनेमात काम न करण्याची मानसिक तयारी अजयने केली आहे. या सिनेमाची निर्मिती यशराज बॅनर करत आहे. यशराजचाही सिनेमा नाकारला यशराज फिल्मला ५० वर्षे पूर्ण होत असल्याने वर्षभर एक उत्सव साजरा केला जाणार आहे. परंतु या उत्सवाअंतर्गंत 'पठाण', 'टायगर ३' या सिनेमांची निर्मिती केली आहे. परंतु या सुवर्णजयंती उत्सवाचा मोठा भाग असलेल्या 'सुपरहिरो' सिनेमात अजय देवगणची निवड झाली होती. मात्र या सिनेमाबाबत अद्याप काही निर्णय झालेला नाही. या सिनेमात अजय नकारात्मक भूमिकेत दिसणार होता. त्याचप्रमाणे या सिनेमातून चंकी पांडेचा पुतण्या अहान पांडे सिनेसृष्टीत पदार्पण करणार होता. या सिनेमाचे दिग्दर्शन राहुल रवैलचा मुलगा शिव रवैल करणार होता. यशराज फिल्मसाठी अजय देवगणने पहिल्यांदा सिनेमा करण्यासाठी सप्टेंबरमध्येच होकार दिला होता. हा होकार देण्यामागे आदित्य चोप्राने अजय देवगणला काम करण्यासाठी केलेली विचारणा आणि सिनेमाची आवडलेली कथा ही दोन महत्त्वाची कारणे होती. परंतु करोनामुळे या सिनेमाचे काम पुढे गेले नाही. त्याच दरम्यान, अजयकडे वेब सीरिज 'लूथर' च्या हिंदीत रिमेकमध्ये 'रुद्र द एज ऑफ डार्कनेस’ मध्ये काम करण्यासाठी विचारणा झाली. या वेब सीरिजमध्ये काम करण्यासाठी अजयने ज्या तारखा दिल्या त्यामुळे यशराजच्या सिनेमात काम करणे त्याला आता शक्य होणार नाही. चाणक्यमधूनही बाहेर? त्याचप्रमाणे नीरज पांडे दिग्दर्शित ‘चाणक्य’ या सिनेमातही अजय काम करणार होता. परंतु याही सिनेमाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे या दोन्ही सिनेमांतून माघार घेण्याचा निर्णय अजयने घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली. सध्या अजय देवगण हिंदीबरोबरच दाक्षिणात्य सिनेमांतही काम करत आहे. एस.एस. राजमौली यांच्या 'आर आर आर' सिनेमातील त्याच्या लूकची जोरदार चर्चा आहे. सध्या अजयकडे 'मैदान','गंगूबाई काठियावाडी', 'मे डे' आणि 'थँक गॉड' हे सिनेमे आहेत. याशिवाय अजयची स्वतःची निर्मिती संस्थेतर्फेही काही नवीन सिनेमांचे प्लॅनिंग तो करत आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3xfmUs2