मुंबई : अभिनेत्री करीना कपूरनंतर 'स्टार व्हर्सेस फूड' या कार्यक्रमात सहभागी होत आहे. हा कार्यक्रम चॅनेलवरून प्रसारित होणार आहे. या कार्यक्रमात सहभागी कलाकार त्यांचा आवडीचा पदार्थ तयार करतात आणि त्यासोबत त्यांच्या आयुष्यातील काही घटना, प्रसंग प्रेक्षकांसोबत शेअर करतात. करण या कार्यक्रमात जपानी रेस्तराँचा मुख्य शेफ आणि सह-मालक लखन जेठानी याच्यासोबत एक खास पदार्थ तयार करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाच्या निमित्ताने करण पहिल्यांदा स्वयंपाक घरात काम करणार आहे. यावेळी तो मृणाल ठाकूर, सीमा खान आणि सयामी खेर या आपल्या मित्रांसाठी विशेष पदार्थ बनवणार आहे. हे पदार्थ करत असतान साधलेल्या संवादातून त्याच्या आयुष्यातील काही सिक्रेटही तो सर्वांसोबत शेअर करणार आहे. कधी कांदाही चिरला नाही या कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर करणने सांगितले की आयुष्यात त्याने कधी कांदाही चिरलेला नाही तरी तो या कार्यक्रमात आला आहे, याचे त्यालाच आश्चर्य वाटत आहे. इतकेच नाही तर स्वयंपाक घरातील गॅझेटचा उपयोग कसा करायचा याचीही माहिती त्याला नाही. असे असले तरी करणने या भागात त्याची आवडती जपानी डिश काट्सू करी आणि क्रॅब सुशी बनवली आहे. या कार्यक्रमात करणने त्याच्या खाण्या-पिण्याच्या सवयींबाबत सांगितले आहे. तसेच त्याच्या मुलांच्या खाण्यापिण्याबाबतही त्याने सांगितले आहे. या कार्यक्रमामध्ये करणने त्याच्या मैत्रिणींसोबत रॅपिड फायर राऊंड खेळला आहे. हे पाहून प्रेक्षकांचे नक्कीच मनोरंजन होणार आहे. दरम्यान, करण जोहर 'दोस्ताना २' सिनेमावरून चांगलाच चर्चेत आला आहे. कार्तिक आर्यनला या सिनेमामधून काढून टाकल्याच्या मुद्द्यावरून तो आणि हा सिनेमा चांगलाच चर्चेत आला आहे. आता या सिनेमामध्ये कार्तिकच्या जागेवर कोणत्या हिरोची वर्णी लागते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3tP4hZY