मुंबई: बॉलिवूड अभिनेता नेहमीच सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. याशिवाय आपल्या अतरंगी फॅशन स्टाइलमुळे तर तो नेहमीच सोशल मीडियावर चर्चचा विषय ठरतो. आताही त्याच्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात तो एका मराठी तरुणाच्या भूमिकेत दिसत आहे. त्याच्या या व्हिडीओनं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. रणवीर सिंगचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा कोणत्या चित्रपटाचा व्हिडीओ नाही तर एका जाहिरातीचा आहे. ज्यात एका विनोदी जाहिरातीसाठी रणवीरने मराठी व्यावसायिकाची भूमिका साकारली आहे आणि तो बायको फेकून मारत असलेली भांडी चुकवतोय, असं यात दिसतं. संपूर्ण ऑर्डर विकली गेल्यानंतर मित्रांसोबत रात्रभर गच्चीवर सेलिब्रेट केलेला रणवीर सिंग बायकोची क्षमा मागताना दिसतो आहे. या जाहिरातीत रणवीर सुंदर मराठी बोलताना दिसत आहे. जेव्हा माफी मागत असतानाही ती ऐकत नाही तेव्हा तो म्हणतो, "अरे काय करतेएस तू, सॉरी म्हणतो ना." रणवीर सिंगनं बॉलिवूडमध्ये 'सिम्बा' आणि 'बाजीराव मस्तानी' या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ज्यात त्यानं मराठी तरुणाची भूमिका साकारली होती. या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3scNAGk