Full Width(True/False)

देवोलीनाने राहुल- दिशाला विचारली लग्नाची तारीख, मजेशीर उत्तर देत अभिनेत्री म्हणाली..

मुंबई- 'बिग बॉस १४' चा दुसऱ्या क्रमांकाचा विजेता ठरलेला आणि त्याची गर्लफ्रेण्ड दिशा परमार सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. राहुल आणि दिशा चाहत्यांचे अत्यंत आवडते आहेत. राहुलने 'बिग बॉस' च्या घरत दिशाला त्याच्या प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर त्यांची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी बनली. नुकतंच त्यांचं एक गाणं प्रदर्शित झालं आहे. 'माधेन्या' या गाण्यामुळे चाहत्यांच्या तोंडी फक्त त्यांचीच चर्चा आहे. अशातच छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री हिने दिशाला त्यांच्या लग्नाबाबत विचारणा केली आहे. दिशा आणि देवोलीना या दोघी एकमेकांच्या खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. देवोलीनाने तिच्या ट्विटर हॅण्डलवर दिशा आणि राहुलच्या नव्या गाण्याचा पोस्टर चाहत्यांसोबत शेअर केला. त्यासोबतच तिने दिशाला त्यांच्या लग्नाबाबतीत विचारणा केली. त्यावर दिशानेही आपल्या मैत्रिणीला सुंदरसं उत्तर दिलं आहे. देवोलीनाने ट्विटरवर पोस्ट करत दिशाला विचारलं, 'राहुल वैद्य आणि दिशा परमार आम्ही तुमच्या लग्नाच्या दिवसाची वाट पाहत आहोत. तो दिवस कधी येईल.' देवोलीनाने केलेलं हे ट्विट पाहून दिशाला राहवलं गेलं नाही. तिनेही मजेशीर उत्तर देत म्हटलं, 'सध्या तरी या चाललेल्या खोट्या लग्नासोबतच काम चालवून घ्या.' त्या दोघींचे हे ट्विट चाहत्यांमध्ये वायरल होत आहेत. तर दुसरीकडे राहुल आणि दिशाच्या 'माधेन्या' ची चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा आहे. त्यांचा म्युजिक व्हिडीओ चाहत्यांना भरपूर पसंत पडला आहे. चाहत्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. या गाण्याच्या चित्रीकरणादरम्यानचे अनेक फोटो चाहत्यांमध्ये वायरल झाले होते. त्यावेळेस दिशा आणि राहुलने लपून लग्न केल्याच्या चर्चाही सुरु होत्या. परंतु, त्यानंतर सगळ्यांना ते गाण्याच्या चित्रीकरणातील फोटो असल्याचं कळालं होतं. सध्या चाहतेदेखील दिशा आणि राहुलच्या खऱ्या आयुष्यातील लग्नाची आतुरतेने वाट बघत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dukVZ0