नवी दिल्लीः ला युजर्संचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. चीनमध्ये या फोनला पहिला सेल पार पडला आहे. कंपनीने सांगितले की, पहिल्या सेलमध्ये केवळ १० सेकंदात १०० मिलियन युआन (जवळपास ११३ कोटी रुपये) हून जास्त फोनची विक्री झाली आहे. कंपनीने या फोनला तीन व्हेरियंट मध्ये ६ जीबी प्लस १२८ जीबी, ८ जीबी प्लस १२८ जीबी आणि १२ जीबी प्लस २५६ जीबी मध्ये लाँच केले आहे. फोनच्या १२ जीबी रॅम व्हेरियंटची किंमत २३९९ युआन म्हणजेच २७ हजार रुपये आहे. पहिल्या सेलमध्ये कंपनी या व्हेरियंटला १०० युआन (जवळपास ११०० रुपये) सूट सोबत ऑफर करीत आहे. वाचाः रियलमी GT नियोचे फीचर मध्ये फोनमध्ये 120Hz चे रिफ्रेश रेट आणि 360Hz चे टच स्मॅप्लिंग रेट सोबत ६.४३ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. फोनला पंचहोल डिजाइन आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सोबत येते. १२ जीबी पर्यंत रॅम आणि २५६ जीबी पर्यंत UFS 3.1 स्टोरेजच्या या फोनमध्ये प्रोसेसर म्हणून मीडियाटेक डायमेंसिटी 1200SoC दिला आहे. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक ८ मेगापिक्सलचा मायक्रो शूटर दिला आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये तुम्हाला १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे. वाचाः या फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 4500mAh ची बॅटरी दिली आहे. फोनला लवकरच चार्ज करण्यासाठी ६५ वॉटची फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे. ड्यूल नॅनो सिम सपोर्टचा हा फोन अँड्रॉयड ११ वर बेस्ड Realme UI 2.0 काम करतो. कनेक्टिविटी साठी फोनमध्ये ड्यूल मोड 5G, ड्यूल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, 3.5mm हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-C सारखे फीचर्स दिले आहेत. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3s2UwFE