नवी दिल्लीः रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची शाखा असलेल्या रिलायन्स फाउंडेशनकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. कोविड १९ महामारीत रुग्णांना मदत करण्यासाठी मुकेश अंबानी हे मदतीला धावून आले आहेत. मुंबईतली रिलायन्स फाउंडेशनच्या हॉस्पिटल मधील राष्ट्रीय खेळ क्लब, (एनएससीआय), सेवन हिल्स हॉस्पिटल्स आणि ट्राईडेंट, बीकेसी मध्ये जवळपास ८७५ बेडची सोय करण्यात आली आहे. ज्यात १४५ आयसीयू सुविधा आहे. वाचाः एनएससीआय मध्ये सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये ६५० बेडची सोय करण्यात आली आहे. रिलायन्स फाउंडेशन १०० नवीन आयसीयू बेडची व्यवस्था करणार आहे. १५ मे २०२१ पासून हे सर्व सुरळीत सुरू होणार आहे. तसेच सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल कोविड रुग्णांसाठी जवळपास ६५० बेडची व्यवस्था करणार आहे, असे सांगण्यात आले आहे. वाचाः ५०० हून जास्त मेडिकल स्टाफ २४ तास सेवेत रुग्णांच्या उपचारासाठी डॉक्टर, नर्सेससह ५०० हून जास्त मेडिकल स्टाफ दिवस रात्र सेवेत कार्यरत आहे. या उपचाराचा सर्व खर्च ज्यात आयसीयू बेड, मॉनिटर वेंटिलेटर आणि मेडिसिनचा समावेश आहे. तो सर्व रिलायन्स फाउंडेशकडून करण्यात येणार आहे. यात पुढेही असे म्हटले की, एनएससीआय आणि सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये सर्व कोविड रुग्णांचा उपचार फ्री मध्ये केला जाणार आहे. वाचाः ७०० टन रोज ऑक्सिजनचा सप्लाय रिलायन्स फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष नीता अंबानीने म्हटले की, एकूण फाउंडेसन जवळपास ८७५ बेडची व्यवस्था करणार आहे. ज्यात १४५ आयसीयू बेडचा समावेश आहे. रिलायन्स फाउंडेशन नेहमी देशाची सेवा करण्यासाठी सर्वात पुढे राहिले आहे. हे आमचे कर्तव्य आहे की, या महामारी विरुद्ध भारताच्या लढाईत आपले योगदान हवे. रिलायन्स गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, दमन, दीव आणि नगर हवेलीला ७०० टन ऑक्सिजन रोज देत आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3sVr454