Full Width(True/False)

भाईजान सलमानचा करोना योद्ध्यांना मदतीचा हात; स्वतः चेक केली फूड क्वालिटी

मुंबई: करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातलं आहे. रोज लाखो लोकांना करोनाचं संक्रमण होताना दिसत आहे. अनेकांनी या व्हायरसमुळे आपले प्राण गमावले आहेत. अनेक बॉलिवूड करोना व्हायरसचं संक्रमण झालेलं आहे. काहींचा मृत्यू देखील झाला आहे. अशात मागच्या वर्षी प्रमाणे अभिनेता सलमान खाननं पुन्हा एकदा करोना काळात लोकांना मदतीचा हात दिला आहे. रोज कोरोना फ्रंटलाइन वॉरियर्ससाठी खाण्याची ५००० पॅकेट्स पुरवत आहे. सलमान खानचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. ज्यात तो पोलीस कर्मचाऱ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांच्या पॅकेट्सच्या क्वालिटीची खातरजमा करुन घेताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये करोना वॉरियर्ससाठी तयार करण्यात आलेलं जेवण सलमान स्वतः टेस्ट करून पाहताना दिसत आहे. मागच्या २ आठवड्यांपेक्षा जास्त काळापासून मुंबई करोना लॉकडाऊनशी सामना करत आहे. अशात ड्यूटीवरवर असलेल्या अनेक करोना वॉरियर्सनी खाण्या-पिण्याच्या गोष्टींसाठी अनेक समस्या येत आहेत. शिवसेना युथ विंग कमिटीचे सदस्य राहुल कणाल यांनी सांगितलं, त्यांची एक संघटना सलमान खानसोबत काम करत आहे. त्यानं यावेळी हे सुद्धा सांगितलं की, सलमानच्या घराच्या आसपास असलेल्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सलमानची आई रोज जेवण पाठवते. सलमान खाननं मागच्या वर्षी प्रमाणं या वर्षीही करोना वॉरियर्सची मदत करणं सुरूच ठेवलं आहे. सलमान खाननं २५ एप्रिलला जेवणाचे ५००० पॅकेट्स भायखळापासून ते जुहू आणि वांद्रे पूर्व येथील बीकेसी पर्यंतच्या भागत वाटले. येत्या काळात या फूड पॅकेट्सची संख्या वाढवली जाणार असून ती १० हजार पर्यंत नेण्याची सलमानची योजना आहे. मागच्या वर्षी लॉकडाऊन झाल्यानंतरही सलमान खाननं प्रवासी मजूर तसेच त्याच्या फार्म हाऊसच्या आसपासच्या भागातील लोकांसाठी अन्नधान्याची सोय केली होती.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aEQ2PS