Full Width(True/False)

शाहिदमुळे बॉबी देओल आणि इम्तियाजमधील संबंध कायमचे बिघडले?

मुंबई- '' हा चित्रपट बॉलिवूडमधील उत्कृष्ट चित्रपटांमधील एक मानला जातो. या चित्रपटाने बॉलीवूडला प्रेमकथांकडे बघण्याचा एक नवा दृष्टिकोन दिला. तरुणाईमध्ये तर या चित्रपटाच्या आजही चर्चा रंगतात. या चित्रपटातील आणि करिना कपूरची जोडी प्रेक्षकांना भयंकर आवडली होती. पण या चित्रपटासाठी शाहिदच्या पूर्वी अभिनेता बॉबी देओलची निवड करण्यात आली होती हे खूप कमी जणांना माहीत आहे. दिग्दर्शक यांनी अचानक बॉबी ऐवजी शाहिदला चित्रपट देऊन देओल कुटुंबाला मोठा धक्का दिला होता. २००५ साली जेव्हा अभय देओलला चित्रपटसृष्टीत पदार्पण करायचं होतं तेव्हा सनी देओलने एका नवीन दिग्दर्शकाला संधी देण्याचा निर्णय घेतला. तो दिग्दर्शक म्हणजे इम्तियाज अली आणि चित्रपटाचं नाव होतं 'सोचा ना था.' या चित्रपटाच्या वेळेस इम्तियाज आणि देओल कुटुंबात चांगले संबंध होते. एके दिवशी इम्तियाज एका चित्रपटाची कथा घेऊन बॉबी देओलकडे आले. त्यांनी त्या चित्रपटाची कथा बॉबीला ऐकवली आणि म्हटलं हा चित्रपट मला तुझ्यासोबत बनवायचा आहे. बॉबीला देखील कथा आवडली असल्याने त्याने होकार दिला आणि चित्रपटाचं नाव ठेवलं गेलं 'गीत'. काही दिवसांनी बॉबीला जाणवलं की इम्तियाज आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे. त्याला वाटलं की ते व्यग्र आहेत म्हणून कदाचित त्यांना वेळ नसेल. काही दिवसांनी देओल कुटुंबाच्या कानावर एक बातमी आली आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांना कळालं की, चित्रपटाचं चित्रीकरण सुरू झालं आहे आणि चित्रपटात बॉबी ऐवजी शाहिद कपूरला घेतलं गेलंय. चित्रपटाचं नाव ठेवण्यात आलं आहे 'जब वी मेट.' त्यानंतर इम्तियाज आणि देओल कुटुंबात कोणत्याही प्रकारचे संबंध राहिले नाहीत. शिवाय बॉबीला न घेण्याचं कारणही गुलदस्त्यातच राहिलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/32L7H45