Full Width(True/False)

कौतुकास्पद! १६ जणांच्या उपस्थितीत मराठी अभिनेत्रीनं उरकलं शुभमंगल!

मुंबई टाइम्स टीम करोनामुळे साखरपुडा, लग्न समारंभ अनेकजण रद्द करत आहेत किंवा पुढे ढकलत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येमुळे अशा कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी सुरक्षा आणि काटेकोर नियमावली पाळावी लागत आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेत यांचा विवाहसोहळा साधेपणानं झाला. मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत दोन तासांत हे शुभकार्य उरकल्याचं क्षितीशनं सांगितलं. सध्याच्या कठीण काळात त्यांनी हा निर्णय का घेतला, हे स्पष्ट करणारी एक पोस्टही त्यांनी शेअर केली आहे. क्षितीश म्हणाला, ‘वाढत्या रुग्णसंख्येमुळे सरकारच्या नियमांमध्ये बदल होत होते. या काळात नक्की काय निर्णय घ्यावा, हे मला आणि ऋचाला समजत नव्हतं. एकूणच अनिश्चिततेची परिस्थिती पाहता अगदी आयत्यावेळी दोन दिवसांआधी लग्न नियोजित दिवशी करायचं ठरवलं. सरकारनी दिलेल्या सूचनेनुसार सगळे नियम पाळून अगदी कमी लोकांमध्ये लग्नसोहळा पार पडला. संपूर्ण विधी दोन तासांत आटपून आम्ही घरी आलो होतो. नातेवाइक, मित्रमंडळी यांना आपल्या आनंदात सहभागी करून घेता आलं नाही, याचं काही क्षण वाईट वाटलं; पण सध्याच्या परिस्थितीत ते अत्यंत आवश्यक आहे. आपण रोज अनेक जण गेल्याच्या, अत्यवस्थ असल्याच्या बातम्या ऐकत आहोत; पण आहे त्या परिस्थितीत काळजी घेऊन आम्ही कार्य पार पाडण्याचा निर्णय घेतला. आमच्याही जवळच्या काही माणसांनी कोव्हिडमुळे जीव गमावला. अनेक जण रुग्णालयात आहेत. या काळातली निराशा नजरेआड न करता अवघ्या सोळा जणांच्या उपस्थितीत हे लग्न झालं. प्रत्येकानं मास्क लावला होता. वावराचं भान राखलं. एकही मित्र नव्हता.’ यात काही कौतुक नाही; तर ही आपली जबाबदारी आहे, असंही क्षितीशनं आवर्जून नमूद केलं.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2S7gI5c