Full Width(True/False)

ऋषी- राजीवनंतर रणधीर कपूर पडले एकटे, विकणार पिढीजात घर

मुंबई- लोकप्रिय अभिनेते आणि करिना कपूरचे वडील यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईच्या कोकिलाबेन इस्पितळात उपचार सुरू आहेत. असं म्हटलं जात आहे की रणधीर यांच्यासोबत त्यांच्या पाच कर्मचाऱ्यांनादेखील करोनाची लागण झाली आहे. त्यांनाही उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आलं आहे. यातच कपूर कुटुंबाशी संबंधित एक बातमी पुढे येतेय. छोटा भाऊ आणि यांच्या मृत्यूनंतर रणधीर यांनी त्यांचं पिढीजात घर विकण्याचा निर्णय घेतला आहे. छोटा भाऊ राजीव यांच्या जाण्याने रणधीर स्वतःला एकटं समजू लागले आहेत. कपूर कुटुंबातील सगळी भावंडं त्यांच्या चेंबूर येथील घरात लहानाची मोठी झाली. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत रणधीर यांनी म्हटलं, 'राजीव नेहमी माझ्यासोबत असायचा. त्याचं स्वतःचं घर पुण्यात होतं पण जास्तीत जास्त वेळ माझ्यासोबत इथे मुंबईतच असायचा. त्याच्या जाण्याने मी एकटा पडलोय. त्यामुळे मी विचार करतोय की माझ्या कुटुंबासोबत वेळ घालावेन. माझ्या आई- वडिलांनी मला सांगितलं होतं की, मला वाटेल तो पर्यंत मी या घरात राहू शकतो पण जेव्हा मी हे घर विकेन तेव्हा मला या घराचे मिळालेले पैसे माझ्या भावंडानादेखील द्यावे लागतील.' आता त्यांनी चेंबूर येथील घर विकण्याचा निर्णय घेतला आहे. चेंबूर येथील घर विकून रणधीर बांद्रा येथे राहायला जाणार आहेत. रणधीर यांनी यापूर्वीच बांद्रामध्ये नवीन घर विकत घेतलं आहे. ते लवकरच त्या घरात शिफ्ट होणार आहेत. याशिवाय राजीव यांच्या मृत्यूनंतर रणधीर आणि रीमा यांनी त्यांच्या संपत्तीवर हक्क सांगितला आहे. त्यासाठी ते दोघे न्यायालयीन लढाई लढत आहेत. परंतु, कोर्टाने त्यांच्याकडे राजीव यांच्या घटस्फोटाचे कागद मागितल्याने त्यांची मोठी अडचण झाली आहे. कारण, राजीव यांचा घटस्फोट कोणत्या फॅमिली कोर्टात झाला याबद्दल दोघांना कोणतीही माहिती नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3ubFoaY