मुंबई: मराठी मालिकांसाठी आणि मालिकेतील कलाकारांसाठी पुरस्कार सोहळे हा खास असतात. नुकताच झी मराठी वाहिनीचा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात अनेक कलाकारांनी पुरस्कार पटकावले तर कलाकारांच्या खास सादरीकरणानं प्रेक्षकांची मनं जिंकली. अनेक कलाकारांनी या पुरस्कार सोहळ्यातील अनुभवाबद्दल सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. '' मालिकेतील अभिनेता यानं देखील एक खास पोस्ट शेअर केली आहे. 'चार पाच वर्षापूर्वी स्ट्रगल करत होतो या क्षेत्रात पाय रोवण्याचा प्रयत्न करत होतो तेव्हा घरी जेव्हा आईबरोबर कुठलाही अवार्ड शो बघायचो तेव्हा अस वाटायचं की आपण पण कधीतरी या मंचावर जाऊन हातात ट्राँफी घ्यावी .. आपणही इथे एकदा तरी डान्स करावा ... आणि मग तेव्हापासून जो काही नाटकाच्या तालमीला उत्साह असायचा ना ; विचारुच नका .याच मंचावरची आणखी एक आठवण ती म्हणजे कधीतरी या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करायला मिळालं पाहिजे .आणि आज 'झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड २०२०-२१' या कार्यक्रमात ही दोन्ही स्वप्न पूर्ण झाली . शशांक भावा तुला खरंच थॅंक्यू तू कमाल आहेस मला खुप सहकार्य केलं स्वप्नांपर्यंत पोहचनं तस अवघड नाहीए ; फक्त जीव तोडून प्रामाणिक प्रयत्न केले पहिजेत.' असं किरणनं त्याच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट खलनायक आणि सर्वोत्कृष्ट व्यक्तीरेखा या हे दोन पुरस्कार किरणनं त्याच्या नावावर केले. किरण आणि यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाला वेगळीच रंगत आली. दोघंही सध्या मालिकांमध्ये खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3fQhXzE