मुंबई: सध्या देशभरात करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचं तांडव सुरू आहे. महाराष्ट्रातील करोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. ज्यामुळे सरकारनं २३ एप्रिलपासून महाराष्ट्रात लॉकडाउन लागू केलं आहे. पण या लॉकडाउनमध्येच अभिनेत्री तिचा पाळीव कुत्रा कॅस्परसोबत फिरायला गेलेली असताना कॅमेऱ्यात कैद झाली. पण लॉकडाउनमध्ये मलायकाचं अशाप्रकारे कुत्र्याला घेऊन बाहेर फिरणं नेटीझन्सना अजिबात आवडलेलं नाही आणि त्यांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरुवात केली आहे. मलायका अरोरा आपल्या पाळीव कुत्र्याला घेऊन मुंबईच्या रस्त्यांवर फिरताना दिसली. यावेळी तिनं मास्क लावला होता आणि ब्लॅक कलरचे स्पोर्ट्स वेअर घातले होते. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जो पाहून अंदाज लावला जाऊ शकतो की, ती कॅस्परला फिरायला घेऊन आली आहे. सोशल मीडियावर अनेक युझर्सनी मलायाकाच्या अशा वागण्यावरून तिला सुनावलं आहे. एका युझरनं लिहिलं, 'सरकारनं परवानगीशिवाय कोणालाही विनाकारण घराबाहेर फिरण्यास बंदी घातली आहे आणि हे सेलिब्रेटी पाहा.' सोशल मीडियावर मलायकाचा पेट डॉगसोबत बाहेर फिरतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिला खूप ट्रोल केलं जात आहे. एका युझरनं लिहिलं, 'मुंबईसाठी लॉकडाउनची वेळ नाही आहे का? इथे लोक घरात मरत आहेत आणि यांना आपल्या पाळीव कुत्र्यांना बाहेर फिरवायचं आहे. हे चांगलं आहे पैसे फेका आणि तमाशा पाहा.' तर दुसऱ्या एका युझरनं लिहिलं, 'ब्रेक द चेनमध्ये मॉर्निग वॉकची परवानगी आहे का?' अशाप्रकारे अनेक युझर्सनी मलायकाला जोरदार ट्रोल केलं आहे. याआधी करोनाच्या काळात व्हेकेशनसाठी मालदीवला जाण्यावरूनही अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं आहे. आलिया भट्ट, रणबीर कपूर, सारा अली खान, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, दिशा पाटनी, टाइगर श्रॉफ हे सर्व सेलिब्रेटी करोना काळातील लॉकडाउनमध्येच व्हेकेशनसाठी परदेशात रवाना झाले आहेत आणि महामारीच्या काळात अशाप्रकारे सेलिब्रेटींचं एन्जॉय करणं लोकांना अजिबात आवडलेलं नाही.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sNmLZl