Full Width(True/False)

बॉलिवूडला करोनाचा आणखी एक धक्का, अभिनेते ललित बहल यांचं निधन

मुंबई: करोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेनं आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेतला आहे. मागच्या काही दिवसात या व्हायरसच्या संक्रमणाचं प्रमाण वाढलं आहे आणि याने बॉलिवूडलाही एकामागोमाग धक्के द्यायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. संगीतकार श्रवण राठोड आणि अभिनेता अमित मिस्त्री यांच्यानंतर आता ज्येष्ठ अभिनेता यांचंही करोना व्हायरसमुळे निधन झालं आहे. ललित यांच्यावर दिल्ली येथील सरिता विहार स्थित अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. पण अखेर शुक्रवारी दुपारी त्यांनी याच रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. ललित बहल यांनी तितली आणि मुक्ति भवन यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. त्यांचा मुलगा कानु बहल सांगितलं की, ७१ वर्षीय ललित बहल यांना मागच्या आठवड्यातच करोनाची लागण झाली होती. करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना अपोलो रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. कानु बहल यांनी सांगितलं की, ललित बहल यांना हृदयाशी संबंधित समस्या अगोदरपासूनच होती. मागच्या आठवड्यात त्यांना करोनाची लागण झाली होती. ज्यामुळे त्यांची तब्येत खूपच बिघडली. फुफ्फुसांमध्ये हे संक्रमण वेगानं पसरलं ज्यामुळे ललित बहल यांना डॉक्टर वाचवू शकले नाहीत. ललित बहल यांनी दूरदर्शनच्या टेली फिल्म 'तपिश', 'आतिश', 'सुनहरी जिल्द' यांचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. त्यांनी लोकप्रिय टीव्ही शो 'अफसाने'मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. याशिवाय ते कंगना रणौतच्या 'जजमेंटल है क्या' या चित्रपटात आणि अमेझॉन प्राइमची वेब सीरिज 'मेड इन हेवन'मध्ये दिसले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2RVROFD