Full Width(True/False)

कुंभमेळ्याहून परतल्यावर दिवंगत श्रवण राठोड यांना झाला करोना

मुंबई : संगीतकार यांचे गुरुवारी रात्री इस्पितळात करोनामुळे निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. श्रवण यांच्यावर के.एस. रहेजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. करोनाबरोबरच त्यांना इतर अनेक आजार झाले होते, अखेर त्यांचे हार्ट अॅटक आणि इतर अवयव निकामी झाल्याने निधन झाले. दरम्यान, श्रवण आणि त्यांची पत्नी काही दिवसांपूर्वी हरिद्वार येथील कुंभमेळ्याला गेले होते. त्यानंतर करोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. श्रवण यांचा मुलगा संजीव यांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले, 'काही दिवसांपूर्वी माझे आई-वडिल हरिद्वार येथे भरललेल्या कुंभमेळ्याला गेले होते. तिथून परत आल्यानंतर बाबांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यांना थकवाही जाणवत होता. त्यामुळे आम्ही त्यांना के. एल. रहेजा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्यांच्या शरीरातील अनेक अवयव काम करत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अखेर त्यांचे गुरुवारी रात्री निधन झाले.' संजीव यांनी पुढे सांगितले, 'बाबांना हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर माझी, भावाची आणि आईची करोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली. सुदैवाने माझ्या भावाचा, दर्शनचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. सध्या माझ्यावर आणि आईवर हॉस्पिलमध्ये उपचार सुरू असून दर्शनला घरातच क्वारन्टाइन केले आहे. आमच्या सोसायटीचे क्वारन्टाइनचे नियम खूप कडक आहेत. परंतु आता बाबांच्या निधनामुळे आम्हाला या नियमांतून थोडी सवलत मिळावी अशी विनंती सोसायटीकडे केली आहे. त्यामुळे दर्शनाला हॉस्पिटलमधील औपचारिकता पूर्ण करण्यासाठी आणि बाबांवर अंत्यविधी करण्यासाठी जाता येईल.' दरम्यान, श्रवण यांच्यावरील उपचारांचा खर्च १० लाख रुपये झाला आहे. ही रक्कम भरल्याशिवाय हॉस्पिटलने त्यांचे पार्थिव देण्यास नकार दिल्याचे वृत्त आले होते. याबाबत संजीव यांनी सांगितले की या सर्व बातम्या खोट्या आहेत. त्यांनी पुढे सांगितले की, 'बाबांचे रात्री उशीरा निधन झाले. त्यामुळे इन्श्युरन्स कंपनी आणि हॉस्पिटल प्रशासन यांच्यात संवाद होऊ शकला नव्हता. परंतु असे काहीही झालेले नाही.' त्यांनी पुढे असेही सांगितले की, 'आतापर्यंत झालेला खर्च ७ लाखांच्या घरात गेला आहे. त्यांच्या संपूर्ण उपचाराचे बील हाती आल्यानंतर इन्श्युरन्स कंपनीबरोबर बोलणे होईल आणि हॉस्पिटलचे बील दिले जाईल आणि अशाप्रकारच्या बातम्या येणे बंद होईल.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PfWc1n