मुंबई: गुजराती सिनेसृष्टी आणि रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेते यांचं आज कार्डियक अरेस्टमुळे निधन झालं. सकाळी ९.३०ते १० च्या सुमारास त्यांचं निधन झाल्याची माहिती आहे.आज सकाळी राहत्या घरी हृदय विकाराचा झटका आल्यानं अमित मिस्त्री यांची प्राण ज्योत मालवली. अमित मिस्त्री मुंबईतील अंधेरी येथील जुहू गल्ली परिसरात वृद्ध आईसोबत राहात होते. 'ओम माय गॉड' आणि ' १०२ नॉट आउट' चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश शुक्ला यांनी अमित मिस्त्री यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे.अमित मिस्त्री यांनी 'बे यार' सारख्या गाजलेल्या गुजराती सिनेमांमध्ये काम केलं होतं. तसंत गुजराती रंगभूमीर त्यांनी स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली होती.तसंच 'क्या कहना', 'एक चालीस की लास्ट लोकल', '99', 'शोर इन द सिटी', 'यमला पगला दीवाना', 'अ जेंटलमन' यासारख्या बॉलिवूड चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. '' मधील अभिनयाचं कौतुकगेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'बंदिश बँडिटस' या वेब सीरिजमध्ये अमित यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. त्यांच्या भूमिकेचं प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनीही कौतुक केलं होतं.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3veCD96