Full Width(True/False)

स्वीटू आणि तुझ्यात काय साम्य आहे? अन्विता फलटणकर म्हणते....

संपदा जोशी ० साकारताना मनात काय विचार होते ?- स्वीटू हे नावच त्या पात्राविषयी सांगतं. ती अन्वितासारखी नसल्याने भूमिका साकारणं आव्हानात्मक होतं. 'गर्ल्स' चित्रपटातील व्यक्तिरेखा आणि स्वीटू यातही खूप फरक आहे. त्यामुळे स्वीटू उभी करताना थोडं दडपण होतं. मला अनेक मुलींच्या प्रतिक्रिया येतात तेव्हा खऱ्या आयुष्यातही स्वीटूसारख्या मुली आहेत याचा प्रत्यय येतो. ० अन्विता आणि स्वीटू यात काय साम्य आहे?- जे आहे ते मान्य करायचं आणि पुढे जायचं आणि आपला आनंद आपणच छोट्या छोट्या गोष्टींतून शोधायचा हे विचार दोघींचे आहेत. त्या दोघीही गुबगुबीत आहेत; पण त्यांना त्यांच्या त्या 'असण्या'वर विश्वास आहे. दिसण्याच्या बाबतीत काही प्रश्न त्यांनाही पडलेत पण त्या त्यातून आत्मविश्वास कमवून त्या स्वतःला सांभाळायला शिकल्या आहेत. मी आणि ती आम्ही दोघी नृत्यांगना आहोत. पण स्वीटू खूप जास्त सहनशील आहे. मी तशी नाही. ० वजनदारपणाबद्दल तुझी मतं काय?- मालिकेचा विषय साधारण त्याबद्दल असला तरीही सोशल मीडियावर वजनाबद्दल बोलणारे, विचारणारे आहेतच. कधीकधी खूप उदास वाटत असल्यावर या गोष्टींचा कुठेतरी फरक पडतो. पण मी आधीपासून अशीच आहे. त्यामुळे मी या परिस्थितीला हाताळायला शिकले आहे. आयुष्यात घडलेल्या काही घटनांमुळे 'मी सुंदर आहे का?' हा प्रश्न मला पडलेला आहे. पण माझ्या आयुष्यात काही माणसांनी मला खूपच सकारात्मकता दिली. मी सगळ्यांना हेच सांगेन की, तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुमचं असणं महत्त्वाचं आहे. ० अभिनय क्षेत्रात काम करायचं कधी ठरवलंस?- मी चार वर्षांची असताना भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली तर पाच वर्षांची असताना पहिल्यांदा नाटकात काम केलं होतं. शाळेत निरनिराळ्या स्पर्धांमध्ये भाग घेणं, त्यांच्यामध्ये बक्षिसं मिळवणं हे करतानाच कदाचित अभिनय क्षेत्रात जायचं ठरलं असावं. म्हणूनच मी शिक्षणही नाटक या विषयात केलं. अभिनय क्षेत्रात जायचं हे मला खूप लहान असतानाच वाटलं असावं पण ते खऱ्या अर्थी जाणवलं ते वयाच्या तेराव्या वर्षी. ० तू उत्तम नृत्यांगना आहेस. त्यासाठी वेळ कसा काढतेस?- मी जगभरातल्या नृत्याचे व्हिडीओ बघते. शूटिंगमधून घरी लवकर आले तर एक तास नृत्याची तालीम करते. नृत्य आणि संगीत मला ऊर्जा देतं. ० काही दिवस मालिकेचं चित्रीकरण बंद असेल. त्यावेळी घरी काय करणार आहेस?- गेले साडेचार महिने सुट्टी न घेता सतत काम केलं आहे. त्यामुळे आता थोडा वेळ आई, दादा-वहिनी यांच्यासोबत घालवायला मिळणार आहे. घरची कामं, स्वयंपाक करता येईल. मालिकांचे काही नवीन भागसुद्धा दाखवले जाणार आहेत. इतर वेळी स्वतःचं काम टीव्हीवर बघता येत नाही पण आता ते बघता येतील.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3dsBLY8