मुंबई : सोनाक्षी सिन्हाने कशाप्रकारे तिचे वजन कमी केले हे आता सर्वांनाच माहिती झाले आहे. परंतु अगदी अलिकडे सोनाक्षीने पुन्हा तिचे काही नवीन फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये सोनाक्षी आधीपेक्षा स्लिम दिसत आहे. सोनाक्षीमध्ये झालेला हा बदल पाहून तिने पुन्हा वजन कमी केल्याने ती अधिक आकर्षक दिसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सोनाक्षीने तिचे अलिकडचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये ती घरातच वर्कआऊट करताना दिसत आहे. हे फोटो शेअर कराना सोनाक्षीने लिहिले, 'जेव्हा तुमच्यासाठी #WFH चा अर्थ वर्कआऊट फ्रॉम होम असा असतो...' सोनाक्षीने दोन फोटो शेअर केले असून त्यात ती वर्कआऊट करताना दिसत आहे. सोनाक्षीने पोस्ट केलेल्या या फोटोंवर तिला खूप लाइक आणि कौतुक करणाऱ्या कमेन्ट मिळाल्या आहेत. सर्वजण सोनाक्षीचा हा नवीन लूक पाहून आश्चर्यचकीत झाले आहेत. धर्माचे सीईओ अपूर्वा मेहता यांनी लिहिले, 'विश्वासच बसत नाही, की ही तू आहेस. एकदम वेगळी दिसत आहेस.' सोनाक्षीमध्ये घडून आलेला हा बदल काही नवीन नाही. कारण याहीआधी तिने 'दबंग' सिनेमासाठी ३० किलो वजन कमी केले होते. आज सोनाक्षीमध्ये घडून आलेल्या बदलासाठी चाहते तिच्यावर भरभरून कौतुकाचा वर्षाव करत आहेत. परंतु एक काळ असा होता की वजन जास्त असल्याने तिला अनेकदा ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. याआधी सोनाक्षीचे वजन ९० किलोहून अधिक होते. जास्त वजन असल्यामुळे होणाऱ्या टीकेबाबत सोनाक्षीने सांगितले, 'अनेक वर्षे वजन जास्त असल्यामुळे मला ट्रोल केले होते. परंतु मला यावर कधीही प्रतिक्रिया द्यावीशी वाटली नाही. कारण मला माहिती आहे यापेक्षा अधिक काही चांगल्या गोष्टी मला करायच्या आहेत.' सोनाक्षीने वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. एका मुलाखतीमध्ये सोनाक्षीने सांगितले होते की, 'सलमान खानने मला वजन कमी करायला सांगितल्यावर मी अधिक जास्त गंभीरपणे विचार केला.' वजन कमी करण्यासाठी तिने पर्सनल ट्रेनरही ठेवला होता. सोनाक्षीला खाण्याची खूप आवड असल्याने वजन वाढण्यामागे ते मुख्य कारण होते. त्यातही तिला जंक फूड जास्त आवडायचे. परंतु वजन कमी करण्याच्या मोहिमेमध्ये तिने जंक फूड खाण्यावर खूप नियंत्रण आणले. शाळेत असताना वजन जास्त असल्याने तिला अनेकदा चिडवले जायचे. परंतु त्याकडे तिने कधीही फार लक्ष दिले नाही. जेव्हा तिने सिनेसृष्टीमध्ये येण्याचे ठरवले तेव्हा तिने वजन कमी करण्याचे चांगलेच मनावर घेतले होते. सुरुवातीला ती ३० सेकंदांपेक्षा जास्त वेळ ट्रेडमिलवर धावू शकायची नाही. परंतु वजन कमी करण्याचा निश्चय तिने केलेला असल्याने तिने ते हळूहळू साध्य करायला सुरुवात केले आणि अखेर तिने वजन कमी केले.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2PjB4HB