नवी दिल्लीः रिलायन्स जिओ प्रीपेड आणि पोस्टपेड दोन्ही कनेक्शन सुविधा देते. पोस्टपेडच्या तुलनेत जिओचे प्रीपेड प्लान थोडे स्वस्त आहेत. जिओचे सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लानची किंमत १९९ रुपये आहे. तर प्रीपेड मद्ये यापेक्षा कमी खर्च येतो. तसेच काही युजर्स बिल पेमेंट जास्त येत असल्याच्या तक्रारी करीत आहे. त्यामुळे ते प्रीपेड पसंत करतात. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी जिओ पोस्टपेड वरून जिओ प्रीपेड मध्ये शिफ्ट करण्याची पद्धत सांगत आहोत. जाणून घ्या डिटेल्स. वाचाः जिओ पोस्टपेड वरून जिओ प्रीपेड मध्ये कसे कराल स्विच हे काम ऑनलाइन केले जाऊ शकते. तसेच जिओ स्टोर वरून जाऊन सुद्धा करू शकाल. करोना व्हायरस जास्त फैलाव होत असल्याने जास्त वेळ बाहेर जाता येत नाही. त्यामुळे तुम्ही घरी बसून जिओ पोस्टपेड वरून जिओ प्रीपेड मध्ये स्विच करू शकता. कंपनी आपल्या अधिकृत वेबसाइटवर ही सुविधा देते. जाणून घ्या ही पद्धत. वाचाः फॉलो करा या स्टेप्स १. जिओच्या अधिकृत वेबसाइट (www.jio.com) वर जा. आणि Sim Home Delivery ऑप्शन वर क्लिक करा. २. आता तुमचे नाव आणि जिओ पोस्टपेड नंबर टाका. ३. दोन्ही डिटेल्स टाकल्यानंतर Generate OTP ऑप्शनवर क्लिक करा. ४. तुमच्या पोस्टपेड नंबरवर ओटीपी येईल. याला टाकून व्हेरिफाय करा. ५. I am interested in Prepaid ऑप्शनला सिलेक्ट करा आणि Port to Jio ऑप्शन वर क्लिक करा. ६. सिम कार्डची डिलिवरीसाठी तुमचा संपूर्ण पत्ता द्या. ७. पत्ता दिल्यानंतर Submit Port to Jio request वर क्लिक करा. ८. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३ ते ४ दिवसांत जिओ एग्झिक्युटीव तुमच्या घरी येईल. ९. आधार कार्ड किंवा ओळखपत्र दाखवल्यानंतर तुम्हाला प्रीपेड सिम देण्यात येईल. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3gDtCCd