Full Width(True/False)

Oscars 2021- क्लो झाओने दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकत रचला इतिहास

मुंबई- लॉस अँजेलिस येथे नुकतीच ९३ व्या ऑस्कर पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यात यांनी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकला आहे. '' या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार जिंकून त्यांनी इतिहास रचला. हा पुरस्कार जिंकणाऱ्या त्या दुसऱ्या महिला ठरल्या आहेत. हा पुरस्कार घेणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय आशियाई महिला आहेत. कॅथरीन बिगेलो या पहिल्या महिला होत्या ज्यांना २००९ साली 'द हर्ट लॉकर' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. क्लो यांनी हा पुरस्कार जिंकल्यावर आनंद व्यक्त करत म्हटलं, 'नोमॅडलँड' चित्रपटाच्या संपूर्ण टीमचे मी खूप आभार मानते. त्यांनी माझी खूप मदत केली. आम्ही एकत्र खूप मोठा प्रवास केला आहे.' क्लो बालपणीच अमेरिकेत आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी समोर आलेल्या प्रत्येक अडचणींवर मात करायचं ठरवलं. 'नोमॅनलँड' हा क्लो यांचा तिसरा चित्रपट आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या पुरस्काराच्या नामांकनामध्ये ‘प्रॉमिसिंग यंग वुमन’ चित्रपटासाठी एमराल्ड फेनेल, ‘मिनारी’ चित्रपटासाठी ली आईजैक चुंग, 'अनदर राउंड’ चित्रपटासाठी थॉमस विंटरबर्ग आणि ‘मँक’ चित्रपटासाठी डेविड फिनचर यांचाही समावेश होता. हा चित्रपट जेसिका बर्डर यांच्या 'नोमॅडलँड' या पुस्तकावर आधारित आहे. चित्रपटात अभिनेत्री फ्रान्सिस मैकडॉरमेड यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटात दाखवण्यात आल्याप्रमाणे, कंपनीला मोठं नुकसान सहन करावं लागल्याने चित्रपटाची नायिका सगळं काही सोडून तिची गाडी घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करते जिथे तिला स्वतःच्या जीवनाचा आणि इतरांच्या जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामधील फरक जाणवतो. क्लो यांनी २०१५ साली 'साँग्ज माय ब्रदर टॉट मी' या चित्रपटातून दिग्दर्शनाची सुरुवात केली होती. त्यानंतर 'रायडर' चित्रपटाने त्यांना खरी ओळख मिळवून दिली.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3aGmWQ1