Full Width(True/False)

'यांनी तर मालदीवला तमाशा बनवलंय', भडकला नवाजुद्दीन सिद्दीकी

मुंबई- करोनामुळे महाराष्ट्रात १५ दिवसांचा लावण्यात आला आहे. आता तर निर्बंध आणखीनच कडक करण्यात आले आहेत. त्यात काही बॉलिवूड कलाकार आणि गोव्याला सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. शिवाय सोशल मीडियावर त्यांचे निरनिराळे फोटोही पोस्ट करत आहेत. बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने अशा कलाकारांवर निशाणा साधत त्यांना खडे बोल सुनावले आहेत. नवाजुद्दीनने त्यांना परिस्थितीची जाणीव नसल्याचं म्हटलं आहे. नुकत्याच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नवाजुद्दीनने बाहेरगावी फिरायला जाणाऱ्या आणि तिथले फोटो शेअर करणाऱ्या कलाकारांबद्दल त्याचं मत व्यक्त केलं. तो म्हणाला, 'ते काय बोलणार? अभिनयाबद्दल? या लोकांनी तर मालदीवला तमाशा बनवून ठेवलं आहे.मला नाही माहीत त्यांनी टुरिझम इण्डस्ट्रीबद्दल काय व्यवस्था केली आहे. पण माणुसकीच्या नात्याने तरी तुमचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करू नका. तुमचे फोटो तुमच्याकडेच ठेवा. इथे सगळे प्रचंड मोठ्या अडचणींचा सामना करत आहेत. करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. जे लोक वाईट परिस्थितीचा सामना करत आहेत त्यांना असे फोटो दाखवून त्यांचं मन मोडू नका.' पुढे नवाजुद्दीन म्हणाला, 'इथे लोकांना खायला अन्न मिळत नाहीये आणि यांना पैसे उडवायचे आहेत. आम्ही जे लोकांची करमणूक करणारे आहोत ना, आम्हाला थोडं मोठं व्हावं लागेल. आम्हाला खूप लोक फॉलो करतात. मग आम्हाला आमची जबाबदारी पार पाडायला हवी.' तुम्ही कधी मालदीवला जाणार का, असं विचारल्यावर नवाजुद्दीन म्हणाला, 'मुळीच नाही, मी इथे बुधानामध्ये माझ्या कुटुंबासोबत राहतो. हेच माझं मालदीव आहे.' यापूर्वीही अनेक कलाकारांनी बाहेर फिरायला जाणाऱ्या कलाकारांना खडे बोल सुनावले आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nj8Pp6