Full Width(True/False)

सर्वात श्रीमंत हिरोः किती आहे ड्वेन जॉनसनची एकूण संपत्ती?

मुंबई: '' अर्थात हॉलिवूडचा एक प्रसिद्ध अभिनेता आहे. ड्वेनचा जगभरात बराच मोठा चाहता वर्ग आहे. त्यानं आता पर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. ज्यात 'द स्कोर्पियन किंग', 'द रनडाउन', 'फास्ट अँड फ्यूरियस' या चित्रपटांचा समावेश आहे. हॉलिवूडमध्ये येण्यआधी ड्वेन WWE चा एक आघाडीचा रेसलर होता. त्यानं अनेक स्पर्धा जिंकल्या आहेत. त्यामुळे त्याला 'द रॉक' या नावानेही ओळखलं जातं. एवढ्या प्रसिद्धीसोबत ड्वेन तेवढंच आरामदायी आयुष्य जगतो. ड्वेन जॉनसन कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक आहे. प्रसिद्ध मासिक फोर्ब्सनं २०१८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार ड्वेन जॉनसन जगातला सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता ठरला होता. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार त्यानं १२४ मिलियन डॉलर म्हणजे ८५० कोटी रुपयांची कमाई केली होती. ड्वेन सुरुवातीपासून श्रीमंत नव्हता. २०१८ मध्ये एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्यानं स्वतःबद्दल सांगितलं होतं जेव्हा त्यानं रेसलिंगच्या विश्वात पाऊल ठेवलं तेव्हा त्याला एका मॅचसाठी फक्त ४० डॉलर मिळत होते. तोच ड्वेन आता वर्षभराच कोटी आणि अब्जवधीची कमाई करतो. 'द सन'नं प्रसिद्ध केलेल्या एका रिपोर्टनुसार ड्वेन जॉनसन तब्बल ३२० मिलियन डॉलर म्हणजे २३५० कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. त्याच्या अलीशान लाइफस्टाइलबद्दल बोलायचं तर त्याला महागड्या गाड्यांची वेड आहे. त्याच्याकडे बऱ्याच महागड्या कारचं कलेक्शन आहे. ज्यात लॅम्बोर्गिनी, फेरारी अशा गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय ड्वेन अनेक अलिशान घरांचा मालक आहे. अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे त्याचा एका अलिशान व्हिला आहे. ज्याची किंमत जवळपास ३७ कोटी रुपये एवढी आहे. याशिवाय दुसऱ्या ५ बेडरुम असलेल्या एका व्हिलाची किंमत जवळपास २३ कोटी रुपये एवढी आहे. तसेच २०१२ मध्ये त्यानं कॅलिफोर्नियामध्ये ६ बेडरुम असेललं घर विकत घेतलं ज्याची किंमत त्यावेळी ३३ कोटी रुपये एवढी होती. ड्वेन जॉनसनकडे फक्त महागड्या कार आणि अलिशान-महागडी घरच नाही तर एक खासगी विमान सुद्धा आहे. ज्यातून त्याच्या कुटुंबासोबत प्रवास करतो. त्याच्या प्रायव्हेट जेटची किंमत जवळपास ४०० कोटी रुपये असल्याचं बोललं जातं. असं शाही आयुष्य जगणाऱ्या ड्वेनला ४६ टक्के अमेरिकन नागरिकांनी अमेरिकेच्या राष्ट्रपती पदासाठी होणाऱ्या निवडणूकीसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी आपला पाठिंबा दिला आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3totYQE