मुंबई : भारताला आण्विक सामर्थ्य प्राप्त करून देण्यामध्ये अत्यंत मोलाची भूमिका बजावली होती ती डॉ. होमी जहांगीर भाभा यांनी. त्यांच्यामुळे भारताला स्वतःचे असे अणुप्रकल्प उभारता आले. डॉ. भाभा यांनी देशाला दिलेले योगदान अतुलनीय असे आहे. अशा या ज्येष्ठ शास्त्रज्ञाच्या आयुष्यावरआधारीत सिनेमाची निर्मिती करण्यात येणार आहे. या सिनेमाची निर्मिती रिलायंस एंटरटेनमेंट प्रॉडक्शन करत असून या सिनेमाचे नाव Assassination of असे ठेवले आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विक्रमजीत सिंह करणार आहे. या सिनेमातून डॉ. भाभा यांच्या आयुष्याचा पट उलगडण्यात येणार आहे, त्याचसोबत त्यांचा जो रहस्यमय मृत्यू झाला त्याचेही गूढ उकलण्यात येणार आहे का, याबाबत उत्सुकता आहे. हा कलाकार साकारतोय डॉ. होमी भाभा भारतामधील सर्वात ज्येष्ठ आणि आदराने डॉ. भाभा यांचे नाव घेतले जाते. त्यामुळे ही भूमिका साकारण्यासाठी तितकाच सक्षम अभिनेता असणे गरजे होते. त्यामुळे निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी डॉ. होमी भाभा यांची भूमिका साकारत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. सैफ अली खानला या भूमिकेत पाहणे नक्कीच उत्कंठावर्धक असणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन विक्रमजीत सिंह करणार आहे. विक्रमजीत यांनी २०१५मध्ये रणबीर कपूर, अर्जुन रामपाल आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'रॉय'सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. बाकीच्या कलाकारांची निवड सुरू सैफ अली खानने या भूमिका साकारण्यासाठी होकार दिल्यानंतर आता इतर कलाकारांची निवड प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये डॉ. भाभा यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या एजेंटच्या भूमिकेसाठीही कलाकाराची निवड केली जात आहे. या ठिकाणी होणार चित्रिकरण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १९६० च्या कालखंडात घडलेल्या घटना या सिनेमात दाखवल्या जाणार आहेत. त्यामध्ये डॉ. भाभा यांच्या हत्येचा कट केल्याची घटनाही दाखवली जाणार आहे. दरम्यान, या सिनेमाचे प्राथमिक काम सुरू असून पुढच्यावर्षी या सिनेमाच्या चित्रिकरणाला सुरुवात होईल. या सिनेमाचे चित्रिकरण भारत आणि बेरुत मध्ये होणार आहे. लवकरच या सिनेमाच्या निर्मितीबद्दल अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3vm1dVl