Full Width(True/False)

Covid-19: कोणत्या हॉस्पिटलचा बेड खाली, कुठे मिळतेय Remdesivir इंजेक्शन या वेबसाइट्सवर मिळणार संपूर्ण माहिती

नवी दिल्लीः संपूर्ण भारतात करोना व्हायरसने पुन्हा एकदा धुमाकूल घातला आहे. मुंबईसह देशभरातील प्रमुख शहरात तसेच ग्रामीण भागात कोविड रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. लागोपाठ दुसऱ्या दिवशी भारतात २ लाखांहून जास्त केसेस समोर आले आहेत. शुक्रवारी करोनाची आकडेवारी २ लाख १७ हजार ३५३ पर्यंत पोहोचली आहे. गुरूवारी ही आकडेवारी २ लाख ७३९ पर्यंत पोहोचली होती. करोनाची दुसरी लाट सर्वात जास्त धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्याने हॉस्पिटलची कमतरता जाणवू लागली आहे. वाचाः फेब्रुवारी महिन्यापासून भारतात लागोपाठ रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. गेल्या १० दिवसांत ही आकडेवारी दुप्पट झाली आहे. करोनाची रुग्णसंख्या ज्या पद्धतीने वाढत आहे ते पाहिल्यास हॉस्पिटलमधील बेड्स, ऑक्सिजन सिलिंडर, प्लाज्मा डोनर आणि इंजेक्शनची कमतरता भासू लागली आहे. अनेक ठिकाणी या इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचा आरोप सुद्धा केला जात आहे. वाचाः सरकारने या ठिकाणी नागरिकांना कडक आदेश दिले आहेत. या इंजेक्शनचा वापर घरात करू नये. Remdesivir इंजेक्शनचा वापर केवळ हॉस्पिटलमध्ये केला जाणार आहे. तोही जे रुग्ण जास्त आजारी असतील त्यांच्यासाठी हा वापर केला जाणार आहे. तसेच ज्यांना जास्त ऑक्सिजनची गरज आहे. वाचाः सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकांची मदत करण्यासाठी अनेक जण पुढे आले आहेत. कोविड रुग्णांची मदत करीत आहेत. अशा काही वेबसाइट्स आहेत ज्या ठिकाणी हॉस्पिटल मध्ये Remdesivir इंजेक्शन आणि बेड्स ची माहिती देण्यात आली आहे. या ठिकाणी सर्व माहिती देण्यात येत आहे. वाचाः या वेबसाइट्स आणि हेल्पलाइन नंबर्सच्या मदतीने अनेक लोकांना मदत केली जाऊ शकते. सिपला- www.cipla.com -info.availability@cipla.com– 8657311088- सिपला सध्या Remdesivir इंजेक्शन्स ला थेट हॉस्पिटल आणि रुग्णांपर्यंत पोहोचू शकते. https://ift.tt/3agu05C या ठिकाणी तुम्हाला कोविड संबंधित सर्व प्रकारची माहिती मिळेल. https://ift.tt/3aSRU4N ही दिल्ली सरकारची वेबसाइट आहे. या ठिकाणी बेड्सची ट्रॅकिंग करू शकते. https://ift.tt/3dnqfx8 Hetero – https://ift.tt/2tBGRw2 -04040473535 https://ift.tt/3d7edWY ही वेबसाइट बेंगळुरूसाठी बनवण्यात आली आहे. https://localsay.in/bed या वेबसाइटवर तुम्हाला रांचीची संपूर्ण माहिती मिळू शकेल. appointment@nanvatihospital.org ज्या रुग्णांना कमी समस्या असेल आणि ज्यांना नर्स आणि डॉक्टरशी चर्चा करायची असेल त्यांच्यासाठी ही साइट. प्लाज्मासाठी या वेबसाइट्सची मदत घेऊ शकता. covidplasma.online/ https://dhoondh.com http://needplasma.in/ PlasmaLine – A community of brave-hearts वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QbjK7Q