Live Updates न्यूयॉर्क- हॉलिवूडचा सर्वात मानाचा समजला जाणारा अकादमी पुरस्कार अर्थात ऑस्कर आज होत आहे. यंदाच्या ९३ व्या अकादमी पुरस्कारामध्ये हॉलिवूडमधील अनेक उत्कृष्ट सिनेमांना नामांकन मिळालं आहे. यात मँक, साउंड ऑफ मेटल, नोमॅडलँड, द फादर, प्रॉमिसिंग यंग वूमन, मिनारी, जुडास अँड द ब्लॅक मसीया आणि द ट्रायल ऑफ शिकागो या सिनेमांचा समावेश आहे. हा कार्यक्रम हॉलिवूडच्या प्रसिद्ध डॉल्बी थिएटरमध्ये होत आहे. भारतात हा पुरस्कार सोहळा स्टार मूव्हीज किंवा स्टार वर्ल्ड वाहिनीवर पाहता येऊ शकतो. Yuh-Jung Youn यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्राचा ऑस्कर जाहीर कोरियन- अमेरिकन सिनेमा Minari च्या अभिनेत्री Yuh-Jung Youn यांनी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्राचा ऑस्कर पटकावला. बेस्ट डॉक्यूमेन्ट्री फीचर फिल्म नेटफ्लिक्सच्या My Octopus Teacher ला बेस्ट डॉक्यूमेन्ट्री फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. Pippa Ehrlich आणि James Reed यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. बेस्ट डॉक्यूमेन्ट्री शॉर्ट सब्जेक्ट बेस्ट डॉक्यूमेन्ट्री शॉर्ट सब्जेक्टचा पुरस्कार Colette सिनेमाला मिळाला. दिग्दर्शक Anthony Giacchino आणि Alice Doyard यांनी हा पुरस्कार जिंकला. बेस्ट एनिमेटेड फीचर फिल्म अॅनिमेडेट सिनेमा Soul ने सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फीचर फिल्मचा पुरस्कार जिंकला. Pete Docter और Dana Murray यांनी हा पुरस्कार स्वीकारला. बेस्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म बंदुकीच्या हिंसाचारावर बनलेल्या इफ अनीथिंग हेपन्स आय लव्ह यू या लघुपटाला सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्ट फिल्मचा पुरस्कार मिळाला आहे. बेस्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म Two Distant Strangers सिनेमासाठी Travon Free और Martin Desmond Roe यांनी लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार पटकावला. बेस्ट साउंडचा पुरस्कार मिळाला.. Riz Ahmed च्या साउंड ऑफ मॅटल या सिनेमाने बेस्ट साउंडचा यंदाचा ऑस्कर पटकावला. Jaime Baksht, Nicolas Becker, Philip Bladh, Carlos Cortés आणइ Michelle Couttolenc यांनी हा पुरस्कार स्वीकारला. विशेष म्हणजे ऑस्करच्या इतिहासात साउंड मिक्सिंग श्रेणीत पुरस्कार जिंकणारी Michelle Couttolenc ही दुसरी महिला आहे. चा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार क्लो झाओ (Chloe Zhao)ला नोमॅडलँड चित्रपटाची दिग्दर्शिका क्लो झाओ यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. यासोबतच हा पुरस्कार घेणाऱ्या त्या पहिल्या चीनी-अमेरिकी महिला आणि वुमन ऑफ कलरच्या मानकरी ठरल्या. रेड कार्पेटवर Riz Ahmed चा जलवा Riz Ahmed ला साउंड ऑफ मेटल या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता या वर्गात नामांकन मिळालं आहे. ऑस्करच्या या कॅटेगरीमध्ये नामांकन मिळालेला तो पहिला मुस्लिम अभिनेता आहे. बेस्ट मेकअप आणि हेअरस्टाइल Ma Rainey's Black Bottom या सिनेमासाठी Sergio Lopez-Rivera, Mia Neal आणि Jamika Wilson यांनी सर्वोत्कृष्ट मेकअप आणि हेअरस्टाइलचा पुरस्कार जिंकला. या सिनेमाला मिळणारा हा दुसरा पुरस्कार आहे. सर्वोत्कृष्ट वेशभुषा Ma Rainey's Black Bottom सिनेमाला सर्वोत्कृष्ट वेशभुषेचा पुरस्कार मिळाला. डिझायनर Ann Roth ला हा पुरस्कार मिळाला. Daniel Kaluuya ने जिंकला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार ब्रिटिश- आफ्रिकन स्टार Daniel Kaluuya ने त्याच्या Judas and The Blck Messiah सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार जिंकला. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट विजेता डेनमार्कचा सिनेमा अनदर राउंडला सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट रुपांतरीत पटकथा Anthony Hopkins यांच्या द फादर सिनेमाने हे पुरस्कार पटकावला. या सिनेमासाठी पटकथा लेखक ख्रिस्तोफर हॅम्प्टन आणि दिग्दर्शक फ्लोरियन झेलर यांना पुरस्कार देण्यात आला. याच श्रेणीत प्रियांका चोप्राच्या द व्हाइट टायगर सिनेमालाही नामांकन मिळाले होते. मात्र दिग्दर्शक Ramin Bahrani यांना हा पुरस्कार मिळाला नाही. सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा केरी मलिगन स्टारर प्रॉमिसिंग यंग वुमन या सिनेमाचे दिग्दर्शक Emrald Fennel ला सर्वोत्कृष्ट मूळ पटकथेचा पुरस्कार जाहीर झाला. ऑस्कर रेड कार्पेटला सुरुवात झाली आहे आणि सेलिब्रिटी रेड कार्पेटवर यायलाही सुरुवात झाली आहे. मिनारी सिनेमातील अभिनेता स्टीव्हन येउन रेड कार्पेटवर दाखल झाला आहे. त्याच्या व्यतिरिक्त ज्येष्ठ अभिनेता Paul Raci ही रेड कार्पेटवर पोहोचले आहेत. चाहते ऑस्कर २०२१ ची आतुरतेने वाट पाहत होते. या वर्षाच्या नामांकनांची घोषणा प्रियांका चोप्रा आणि तिचा नवरा निक जोनस यांनी केली होती. प्रियांकाच्या द व्हाइट टायगरला सर्वोत्कृष्ट अॅडेप्टेड स्क्रीनप्ले या विभागात नामांकन मिळालं आहे. यंदाना अनेक नावं नवा इतिहास रचताना दिसणार आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3sOP5uA