नवी दिल्लीः in India: हँडसेट निर्माता कंपनी सॅमसंगने आगामी स्मार्टफोन गॅलेक्सी एम ४२ ५जी ला लवकरच लाँच करण्याची शक्यता आहे. आता नवीन लीक झालेल्या माहितीनुसार, भारतात या फोनच्या किंमतीचे संकेत मिळत आहेत. फोनची उपलब्धता आणि त्याची काही प्रमुख फीचर्स लीक झाली आहेत. या फोनसंबंधी एक व्हिडिओ टीजर नुकताच लीक झाला होता. या व्हिडिओ टीजरवरून उघड झाले होते की, Samsung Mobile फोनला ५जी सपोर्ट मिळणार आहे. वाचाः याशिवाय, स्पीड आणि मल्टीटास्किंग साठी फोनमध्ये Qualcomm Snapdragon 750G SoC चा वापर करण्यात येऊ शकतो. न्यूज एजन्सी आयएएनएसने इंडस्ट्री सूत्रांच्या हवाल्याने माहिती दिली आहे की, सॅमसंगच्या या 5G Smartphone ची किंमत २० हजार ते २५ हजार रुपये असू शकते. याशिवाय, उपलब्धतेसंबंधी ही माहिती समोर आली आहे की, लाँचिंग नंतर हँडसेटची विक्री सॅमसंग इंडियाच्या ऑनलाइन स्टोर शिवाय ई-कॉमर्स साईट Amazon आणि पार्टनर रिटेल आउटलेट वर होणार आहे. वाचाः कंपनीची गॅलेक्सी एम सीरीजचा पहिला असा स्मार्टफोन आहे. ज्यात ५जी कनेक्टिविटी आणि Knox सिक्योरिटी सपोर्ट सोबत येणार आहे. Samsung Knox एक मल्टी-लेयर्स सिक्योरिटी सॉल्यूशन आहे. जो स्मार्टफोनमध्ये मेलवेयर आणि अन्य धोकादायक संवेदनशील माहितीला सुरक्षित करू शकतो. वाचाः हँडसेटच्या ६ जीबी आणि ८ जीबी दोन रॅम पर्याय उपलब्ध केले जाऊ शकते. पहिल्या टीजर व्हिडिओत लवकरच लाँच होण्याचे संकेत मिळाले होते. फोन Android 11, 128 जीबी पर्यंत स्टोरेज आणि ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर सोबत बाजारात लाँच केला जाऊ शकतो. याशिवाय या फोनमध्ये 6000 mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते. Galaxy M42 5G आतापर्यंत NFC, वाय-फाय अलायन्स आणि BIS सारख्या अनेक सर्टिफिकेसन साइटवर स्पॉट केले गेले आहे. ज्यावरून हे संकेत मिळत होते की, फोनला लवकरच लाँच केले जाऊ शकते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2OHHaRC