नवी दिल्लीः BSNL ने आपल्या सब्सक्राइबर्ससाठी नवीन प्रीपेड प्लान रोलआउट केले आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी १९७ रुपयांचा प्रीपेड प्लान लाँच केला आहे. यासोबतच सर्विस प्रोव्हाइडर काही प्लान बंद केले आहेत. तर काही सध्याच्या प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. वाचाः या १९७ रुपयांच्या प्लानमध्ये सर्व बीएसएनएल युजर्संना रोज २ जीबी डेटा मिळणार आहे. यानंतर रोज मिळणारा डेटा संपल्यानंतर 80Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरता येऊ शकते. याशिवाय, या प्लानमध्ये रोज 100 SMS मिळू शकते. या प्लानमध्ये युजर्संना Zing Music अॅपचे फ्री अॅक्सेस मिळू शकणार आहे. याशिवाय या प्लानमध्ये तुम्हाला १८० दिवसांची वैधता मिळते. वाचाः BSNL ने चार प्लान केले बंद या नवीन प्लानला लाँच केल्याशिवाय बीएसएनएलने काही आपल्या प्लानला बंद सुद्धा केले आहे. BSNL ने ४९ रुपये, १०९ रुपये, ९९८ रुपये, आणि १०९८ रुपयांचे प्लान बंद केले आहेत. जे ग्राहक या प्लानचा वापर करीत आहेत. ते वैधता संपेपर्यंत याला वापरू शकतात. वाचाः या प्लानसाठी मोजावे लागणार जास्त पैसे बीएसएनएलने या प्रीपेड प्लान्सला बंद करण्यासोबतच याच्या ३६५ रुपयांच्या प्लानची किंमत वाढवली आहे. आता या प्लानसाठी ग्राहकांना ३९७ रुपये द्यावे लागतील. या प्लानध्ये ग्राहकांना ६० दिवसांची वैधता सोबत फ्री कॉलिंग सोबत रोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएसची सुविधा मिळू शकते. वाचाः BSNL ने लाँच केला नवीन प्लान बीएसएनएलने ४८५ रुपयांचा प्रीपेड प्लान लाँच केला आहे. या प्लानमध्ये लोकल आणि एसटीडी कॉलिंग सोबत रोज १०० एसएमएस ची सुविधा मिळते. याशिवाय, या प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा मिळतो. यासोबतच सब्सक्रायबर्सला फ्री कॉलर ट्यूनची सुविधा मिळते. याची वैधता ९० दिवसांची आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3dyaQsS