Full Width(True/False)

Video करोना काळातील राजकारणावर नकुल मेहतानं सादर केली कविता

मुंबई: देशात सध्या करोना व्हायरसनं अक्षरशः थैमान घातलं आहे. पण अनेक राजकीय नेते आणि पक्ष मात्र अशा परिस्थितीत लोकांच्या गरजांकडे लक्ष देण्याचं सोडून आपलं राजकारण करत आहेत. यावर 'इश्कबाज' फेम नकुल मेहतानं एक कविता सादर केली आहे. याचा व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. नकुलचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. करोना काळात देशात सुरू असलेल्या राजकारणावर टीका करताना नकुलनं एक कविता सादर केली आहे. नकुल मेहतानं शेअर केलेली ही कविता अजय सिंह यांनी लिहिली आहे. कवितेचं नाव आहे 'मरघट का शहंशाह' नकुलनं ही कविता वाचतानाचा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यासोबतच हा व्हिडीओ नकुलनं अजय सिंह यांना टॅग केलं आहे. सोशल मीडियावर नकुल मेहताच्या या कवितेचं खूप कौतुक केलं जात आहे. ही कविता युझर्सच्या पसंतीस उतरली आहे. अनेकांनी ही कविता रिशेअर केलं आहे. काही महिन्यांपूर्वीच बाबा झाला आहे. काही दिवसांपूर्वी बायलेट्रल इन्गुइनल हर्नियाची समस्या आहे. ज्यामुळे बाळावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. आपल्या बाळाला होत असलेल्या या त्रासामुळे नकुल आणि त्याची बायको दोघंही खूप दुःखी आहेत.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3gok5yQ