नवी दिल्लीः वोडाफोन आयडिया म्हणजेच Vi कडे एकापेक्षा एक जबरदस्त प्रीपेड प्लान उपलब्ध आहेत. या सर्व रिचार्ज प्लानमध्ये हाय स्पीड डेटा, फ्री कॉलिंग आणि प्रीमियम अॅपचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी वोडाफोन आयडियाच्या अशा प्रीपेड प्लानसंबंधी माहिती सांगणार आहोत. ज्यात तुम्हाला हाय स्पीड डेटा आणि फ्री कॉलिंग सोबत फोनची वॉरंटी एक वर्षापर्यंत सुविधा मिळेल. जाणून घ्या. वाचाः वोडाफोन-आयडियाचा ८१९ रुपयांचा प्रीपेड प्लान वोडाफोन आयडियाचा हा प्लान अन्य कंपन्यांच्या तुलनेत खूप वेगळा आहे. या रिचार्ज प्लानमध्ये विवोच्या स्मार्टफोनवर १ वर्षाची एक्सटेंड वॉरंटी मिळते. जर तुमच्याकडे विवोचा स्मार्टफोन असेल तर त्याची वॉरंटी एक वर्षासाठी वाढवून मिळेल. या सुविधेसाठी कंपनीचे नियम व अटी मानाव्या लागतील. अन्य सेवा म्हणजे या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा आणि १०० एसएमएस दिले जातील. याशिवाय, फ्री कॉलिंग आणि व्हीआय मूव्ही सह लाइव्ह टीव्हीचे सब्सक्रिप्शन फ्री मिळेल. या रिचार्ज प्लानची वैधता ८४ दिवसांची आहे. वाचाः वोडाफोन आयडियाचे वाय फाय कॉलिंग फीचर वोडाफोन आयडियाने गेल्या वर्षी वाय फाय कॉलिंग फीचर जारी केले होते. युजर्स या सेवेसाठी विना नेटवर्क सुद्धा कॉलिंगची मजा घेऊ शकतात. कंपनीच्या म्हणण्यानुसार, वाय फाय कॉलिंग एक एकीकृत सेवा आहे. ज्यात तुम्हाला वायरलेस इंटरनेट कनेक्शन सारखे होम ब्रॉडबँड, कार्यालय ब्रॉडबँड किंवा सार्वजनिक वाय फाय वर व्हाइस कॉल करण्यासाठी परवानगी देते. यामुळे तुम्हाला नेटवर्क कव्हरेजच्या क्षेत्रात व्हाइस कॉल करण्यास मदत मिळते. वाचाः काय आहे VoWi-Fi सर्विस नावावरूनच माहिती होते की, ही वाय फाय च्या माध्यमातून कॉलिंग आहे. याचा अर्थ सर्विससाठी वाय फाय असणे गरजेचे आहे. वाय फायच्या मदतीने व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ आणि ऑडियो करू शकता. VoWiFi सर्विसच्या मदतीने नॉर्मल मोबाइलने ऑडियो आणि व्हिडिओ कॉलिंग करू शकता. ही एकदम फ्री आहे. यासाठी मोबाइल फोनमध्ये नेटवर्कची गरज नाही. VoWiFi ची सुविधा Xiaomi आणि OnePlus च्या काही निवडक स्मार्टफोनमध्ये मिळते. यासाठी ४ जी सिम असणे आवश्यक आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3p4sOsl