Full Width(True/False)

२,५०० रुपयांनी स्वस्त झाला 5000mAh बॅटरी असणारा Oppo A53, जाणून घ्या नवीन किंमत

नवी दिल्लीः तुम्ही मिड-रेंज स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ओप्पो ए53 हा स्मार्टफोन खरेदी करण्याची तुमच्याकडे चांगली संधी आहे. 16 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आणि 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटसह येणाऱ्या ओप्पो ए53 स्मार्टफोनच्या किंमतीत 2500 रुपयांनी कपात झाली आहे. यामुळे हा फोन स्वस्तात खरेदी करू शकता. वाचाः स्पेसिफिकेशन ओप्पो ए53 स्मार्टफोनमध्ये 6.53 इंच एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 90 हर्ट्ज आणि आस्पेक्ट रेशिओ 20:9 आहे. यात Snapdragon 460 SoC प्रोसेसर देण्यात आले आहे. कॅमेऱ्याबद्दल सांगायचे तर यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात 13 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा सेंसर, 2 मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल डेप्थ कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनमध्ये 18 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. वाचाः ओप्पो ए53 किंमत मागील वर्षी ओप्पोने या स्मार्टफोनच्या 4 जीबी रॅम बेस मॉडेलला 12,990 रुपये आणि 6 जीबी रॅम + 128 जीबी व्हेरिएंटला 15,490 रुपयांना लाँच केले होते. मात्र, आता 2500 रुपयांची कपात केल्यानंतर 4 जीबी व्हेरिएंटची किंमत 10,990 रुपये झाली आहे. तर 6 जीबी व्हेरिएंट 12,900 रुपयांना खरेदी करता येईल. दरम्यान, ई-कॉमर्स साइट Flipkart आणि Amazon वर ओप्पो ए53 स्मार्टफोन सध्या जून्या किंमतीतच उपलब्ध आहे. कंपनीने किंमतीत कपात ही ऑफलाइन स्टोर्ससाठी केली आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/332LazR