नवी दिल्लीः जगभरात कोरोना व्हायरस महामारीने थैमान घातले आहे. या महामारीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली असून, प्रत्येक जण मदतीचा हात पुढे करत आहे. यातच आता दिग्गज टेक कंपनी गुगलने आपल्या होमपजवर डुडलद्वारे खास संदेश दिला आहे. गुगलने डुडलद्वारे व्हायरसपासून वाचण्यासाठी मास्क घालणे आणि लस टोचून घेण्यासाठी लोकांना प्रेरित केले आहे. जगभरात लसीकरण केले जात आहे, यातच गुगलने या खास डुडलद्वारे लोकांना लस टोचून घेण्याचे आवाहन केले आहे. वाचाः याआधीही व्हायरससंदर्भात बनवले होते अनेक डुडल गेल्या वर्षी देखील देश संकटाचा सामना करत असताना गुगलने कोरोनाव्हायरस थीमवर अनेक डुडल बनवले होते. आपल्या नवीन डुडलमध्ये आपल्या नावाच्या सर्व अक्षरांवर फेस मास्क लावला आहे. यासोबतच, लसीचा डोस आणि हातावर लस घेतल्यानंतर बँडेज लावल्याचे दाखविण्यात आले आहे. गुगलचे हे खास डुडल सर्वांचे लक्ष आकर्षित करत आहे. या डुडलमध्ये सर्व अल्फाबेट्स आनंदाने नाचताना दिसत आहे. ‘गेट वॅक्सिनेटेड, वियर मास्क, सेव्ह लाइव्स' या मेसेजद्वारे गुगल लोकांना लस टोचून घेण्याचे आवाहन करत आहे. या डुडलवर क्लिक केल्यानंतर आतापर्यंत कितीजणांनी लस घेतली, लस केंद्र, त्यासंदर्भातील बातम्यांची माहिती मिळते. डुडल वॅक्सिन ट्रॅकर म्हणून देखील काम करते गुगलचे हे डुडल वॅक्सिन ट्रॅकर म्हणून देखील काम करते. ज्यात सर्व देशांच्या वॅक्सिन सेंटरचा मॅप दर्शविण्यात आला आहे. गुगलच्या ब्लॉगमध्ये लिहिले आहे की, ‘आपल्या व आपल्या समुदायाच्या मदतीसाठी अधिक संसाधनांबाबत जाणून घ्या. नेहमी जागरूक रहा आणि आमच्याशी जोडलेले रहा. आम्ही नवीन पद्धतीने मदत करण्यास तयार आहोत.’ गेल्या वर्षी कोरोनायोद्धांच्या कामाचे कौतुक करत गुगलने 'थँक यू कोरोनाव्हायरस हेलपर्स' अशा स्वरूपाचे डुडल बनवले होते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2QE5SUc