Full Width(True/False)

'ए पागल औरत' म्हटल्यामुळे अडकलेले 'जेठालाल' फेम दिलीप जोशी

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता यांनी अनेक सिनेमा आणि मालिकांमध्ये काम केले आहे. परंतु त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती सब टीव्हीवरील ‘’ या मालिकेतून. या मालिकेतील ‘’ ही व्यक्तीरेखा आज देशभरात प्रसिद्ध आहे. गेली १३ वर्ष दिलीप जोशी ही मालिका करत असून वेगवेगळ्या पद्धतीने ते प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. मात्र यशाच्या शिखरावर असणाऱ्या या मालिकेत दिलीप जोशी यांनी या कार्यक्रमामध्ये एकदा असा डायलॉग म्हटला होता की त्यावरून खूप वाद निर्माण झाला होता. इतकेच नाही तर या डायलॉगवरून काही महिला संघटनांनी त्यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. या सर्वांचा खुलास खुद्द दिलीप जोशी यांनी एका पॉडकास्टमध्ये केला होता. यावरून झाला होता गोंधळ 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत दिलीप जोशी हे जेठालालटी भूमिका साकारत आहेत तर दिशा वकानी दयाबेनची भूमिका साकारत होती. या मालिकेच्या सुरुवातीच्या काही भागांत 'जेठालाल' त्यांच्या बायकोला म्हणजे ''ला उद्देशून 'ए पागल औरत' असा डायलॉग बोलताना दिसले होते. परंतु काही दिवसांनी हा डायलॉग या कार्यक्रमात ऐकू आला नाही, कारण तो या कार्यक्रमातूनच काढून टाकला होता. इतकेच नाही तर हा डायलॉग न म्हणण्याची दिलीप जोशी यांना सक्त ताकीदही देण्यात आली होती. स्वतःच केली सुधारणा प्रसिद्ध विनोदी अभिनेता सौरभ पंत यांच्या एका पॉडकास्टमध्ये दिलीप जोशी यांनी या डायलॉगबद्दल सांगितले, ते म्हणाले, ' ए पागर औरत...' हा डायलॉग त्यांनी स्वतःच केला होता. सेटवर अशी एकदा वेळ आली होती की दयाबेनने असे काही करते की त्यामुळे उत्स्फूर्तपणे माझ्या तोंडून 'ए पागल औरत, क्या कुछ भी बोल रही है...' असे निघून गेले.' त्यानंतर या डायलॉगवरून खूप वाद झाला. 'ए पागल औरत' असे म्हणण्यामागे दिलीप यांना म्हणायचे होते की दया तू हे काय करत आहे... परंतु लोकांनी या डायलॉगचा अर्थ भलताच घेतला आणि त्यावरून खूप गोंधळ घातला. दिलीप यांनी सांगितले की, यामागे त्यांचा कोणता वाईट हेतू नव्हता अथवा कुणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता. तसेच कुणाचाही अवमान करायचा नव्हता. ते हा डायलॉग अतिशय सहजपणे आणि उत्स्फूर्तपणे बोलून गेले होते आणि लोक त्याचा चुकीचा अर्थ काढून खूप नाराज झाले होते.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2RjmxvS