Full Width(True/False)

'या' कंपनीनं भारतात लाँच केला स्टायलिश वायरलेस माउस, 600mAhची रिचार्जेबल बॅटरी, पाहा किंमत

नवी दिल्लीः भारतात गेमिंग हेडफोन लाँच केल्यानंतर फ्रान्सची कंपनी ZOOOK ने भारतीय बाजारात स्टायलिश गेमिंग ZOOOK Blade लाँच केला आहे. ZOOOK Blade माउस पाहायला खूपच बेस्ट दिसत असून तो जवळपास अॅपल माउस प्रमाणे दिसतो आहे. ZOOOK Blade मध्ये रबर स्क्रॉल व्हील आहे. ज्यात स्क्रीन फ्रेंडलीचा दावा करण्यात आला आहे. वाचाः ZOOOK Blade गेमिंग माउस एलईडी बॅकलाइट सोबत येतो. याशिवाय, वेगवेगळ्या सात रंगात उपलब्ध आहे. जर कोणाला प्लेयरचा गेमिंग वेळी लक्ष विचलीत होत असेल तर एलईडी लाइटला बंद केले जाऊ शकते. याची बॉडी एबीएस प्लास्टिकची आहे. याचा कॉलर लेदरचा आहे. ZOOOK Blade एक रिचार्जेबल गेमिंग माउस आहे. ज्यात ६०० एमएएच क्षमतेची लिथियम आयन बॅटरी दिली आहे. माउसच्या बॅटरीला यूएसबी केबल द्वारे चार्ज केले जाऊ शकते. याशिवाय, माउसचे आणखी एक खास वैशिष्ट्ये म्हणजे यात मल्टी स्टेज एनर्जी मोड दिले आहे. यात ऑटो स्लिपिंग मोड दिले आहे. १० मिनिटापर्यंत वापर न झाल्यास हे माउस स्लिपिंग मोड मध्ये जाते. वाचाः या गेमिंग माउस मध्ये २.४ वायरलेस टेक्नोलॉजी दिली आहे. याचा वापर करण्यासाठी कोणत्याही ड्रायवरची गरज नाही. यात तीन स्पीड ८००, १२०० आणि १६०० दिली आहे. तसेच याला विंडोज 7/8/10/XP, Vista 7/8, Mac आणि Linux चा वापर केला जाऊ शकतो. झूक ब्लेडची किंमत ९९९ रुपये आहे. याची विक्री ऑफलाइट स्टोरवर होत आहे. वाचाः वाचाः वाचा : वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33oN65W