Full Width(True/False)

३९७ रुपयांचा की, ३९८ रुपयांचा, BSNL चा कोणता प्लान बेस्ट?, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने नुकताच ३६५ रुपयांचा वार्षिक प्रीपेड प्लान अपडेट केला आहे. आता या प्लानची किंमत ३९७ रुपये आहे. यात सुरुवातीला ६० दिवसांसाठी २ जीबी हाय स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि ६० एसएमएस मिळत होते. बीएसएनएचा ३९८ रुपयांचा प्रीपेड प्लान आहे. याचा फायदा २०२१ पर्यंत घेता येऊ शकते. जाणून घ्या एक रुपये फरक असलेल्या या दोन प्लान संबंधी. वाचाः ३९७ रुपयांचा प्लान बीएसएनएलच्या ३९७ रुपयांच्या प्रीपेड प्लानच्या सुरुवातीला अनलिमिटेड व्हाइस कॉल ऑफर केली जात होती. या प्लानमध्ये २ जीबी डेटा रोज दिला जात होता. प्लानची वैधता ३६५ दिवस म्हणजेच एक वर्ष होती. या प्लानला रिचार्ज केल्यास तुम्हाला फ्री पर्सनालाइज्ड रिंग बॅक टोन आणि १०० एसएमएस रोज देते. २ जीबी डेटा संपल्यानंतर स्पीड कमी होऊन 80Kbps होते. या प्लानमध्ये रोज नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलची सुविधा मिळते. ३६५ दिवसांची वैधता शिवाय, अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग, डेटा PRBT सुविधा सुरवातीला ६० दिवसासाठी मिळत होती. वाचाः ३९८ रुपयांचा प्लान बीएसएनएलने जानेवारीत ९० दिवसांसाठी प्रमोशनल पीरियडसाठी ३९८ रुपयांचा प्रीपेड प्लान लाँच केला होता. कंपनीने या प्लानला आता ८ जुलै २०२१ रोजी वाढवले होते. या प्लानमध्ये विना FUP लिमिटसाठी अनलिमिटेड डेटा मिळतो. याशिवाय, अनलिमिटेड कॉलिंग, १०० फ्री एसएमएस महिना भरात ऑफर केले जाते. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xRb1sx