Full Width(True/False)

7000mAh बॅटरीचा सॅमसंग स्मार्टफोनच्या किंमतीत पुन्हा एकदा मोठी कपात, पाहा नवी किंमत

नवी दिल्लीः 7000mAh बॅटरीचा दमदार बॅटरी सोबत येणारा सॅमसंगचा पहिला स्मार्टफोन Galaxy M51 पुन्हा एकदा स्वस्त झाला आहे. च्या किंमतीत दुसऱ्यांदा कपात करण्यात आली आहे. गॅझेट्स नाऊच्या एका रिपोर्टमधून ही माहिती उघड करण्यात आली आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनच्या किंमतीत गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात २ हजार रुपयांची कपात करण्यात आली होती. या कपातीनंतर ६ जीबी रॅमच्या फोनची किंमत २२ हरजार ९९९ रुपये झाली होती. तर ८ जीबी रॅम फोनची किंमत कपातीनंतर २४ हजार ९९९ रुपये झाली होती. कंपनीने आता पुन्हा एकदा फोनच्या किंमतीत कपात केली आहे. वाचाः आता ३ हजार रुपयांची कपात Samsung Galaxy M51 च्या किंमतीत आता ३ हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता या स्मार्टफोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत १९ हजार ९९९ रुपये झाली आहे. तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत २१ हजार ९९९ रुपये झाली आहे. या फोनचे खास फीचर्स म्हणजे यात 7,000 mAh ची बॅटरी आण रिव्हर्स चार्जिंग फीचर दिले आहे. वाचाः Samsung Galaxy M51 चे फीचर्स या फोनमध्ये ६.७ इंचाचा Infinity O डिस्प्ले दिला आहे. सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये ऑक्टा कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 730G प्रोसेसर दिला आहे. स्मार्टफोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग आणि २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिले आहे. कंपनीचा दावा आहे की, फोनला २ तासांपेक्षा कमी वेळात फुल चार्ज केले जाऊ शकते. स्मार्टफोन ६ जीबी रॅम आणि ८ जीबी रॅम मध्ये येते. स्मार्टफोनमध्ये १२८ जीबी स्टोरेज येते. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेज वाढवता येऊ शकते. वाचाः फोनमध्ये ६४ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा सॅमसंगच्या या स्मार्टफोनमध्ये रियर मध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनमध्ये एलईडी फ्लॅश सोबत ६४ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा दिला आहे. फोनच्या बॅकला १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, ५ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. फ्रंट मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी ३२ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bi4sps