Full Width(True/False)

Amazon वरून ऑर्डर केले माउथ वॉश, मुंबईच्या या तरुणाला डिलिवर झाला १३ हजाराचा स्मार्टफोन

नवी दिल्लीः सध्या करोना काळ सुरू असल्याने अनेक जण ऑनलाइन सामान मागवत आहेत. तुम्ही विचार करा जर एखाद्याने १०० रुपयांचे कोणतेही सामान ऑनलाइनर ऑर्डर केल्यास तुमच्या घरी जर १३ हजारांचा स्मार्टफोन डिलिवर झाला तर तुम्ही काय करणार. परंतु, पॅकेज सोबत रिसिप्ट अन्य कोणाच्या तरी नावावर असेल तर तुम्ही याला परत कराल. असाच काही प्रकार मुंबईतील लोकेश डागा या नावाच्या तरुणासोबत झाला आहे. या युजरने अॅमेझॉनवरून माउथ वॉश ऑर्डर केले होते परंतु, लोकेशला रेडमी नोट १० स्मार्टफोनची डिलिवरी झाली. वाचाः लोकेशने याची माहिती ट्विट करून दिली आहे. तसेच अॅमेझॉनला पॅकेज रिटर्न करण्यासाठी आणि ज्या व्यक्तीने हे ऑर्डर केले त्या व्यक्तीला ते देण्याची विनंती लोकेशने आपल्या ट्विट मधून केली आहे. लोकेशने ३९६ रुपयांचे कोलगेट माउथ वॉश अॅमेझॉनवरून ऑर्डर केले होते. परंतु, त्याला रेडमी नोट १० डिलिवर करण्यात आला. या फोनची सुरुवातीची किंमत १२ हजार ४९९ रुपये आहे. लोकेशने आपल्या ट्विट मध्ये म्हटले की, वॉश सारखे प्रोडक्ट नॉन रिटर्नेबल असतात. त्यामुळे या अॅपद्वारे याला रिटर्न करू शकत नाही. त्यामुळे मी कंपनीला ई-मेल केला आहे. वाचाः लोकेशचे हे ट्विट व्हायरल झाले आहे. युजर्संकडून अनेक कमेंट येत आहेत. अनेक जण म्हणाले की, याला रिटर्न करण्याची गरज नव्हती. भानू सिंह नावाच्या एका युजरने म्हटले की, लोकेश भाई, फोन मला दे. मला याची गरज आहे. मी तुला दोन माउथ वॉश पाठवून देतो. यासारखे अनेकांनी मजेशीर कमेंट्स केले आहेत. वाचा : वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33LRdcg