Full Width(True/False)

WhatsApp वर ‘ही’ ट्रिक फॉलो करा, समोरच्याला मेसेज वाचलेले समजणारही नाही

नवी दिल्ली : इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप आपल्या ग्राहकांसाठी अनेक नवीन फीचर्स आणत असते. व्हॉट्सअ‍ॅपवर अनेक असे फीचर्स आहेत, ज्याबाबत यूजर्सला माहिती नसते. या लेखात व्हॉट्सअ‍ॅपच्या अशाच एका फीचरबद्दल जाणून घेऊया, ज्याचा वापर करून तुम्ही समोरील व्यक्तीचा मेसेज वाचला आहे, हे देखील त्या व्यक्तीला समजणार नाही. वाचा : व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्या व्यक्तीचा मेसेज आल्यानंतर तो आपण पाहतो. अशात ब्लू टिकमुळे त्या व्यक्तीला आपण मेसेज पाहिल्याचे समजते, यामुळे त्या मेसेजकडे दुर्लक्षित न करता आपल्याला उत्तर द्यावेच लागते. मात्र, एका खास फीचरमुळे तुम्ही मेसेज पाहिला की नाही हे समोरील व्यक्तीला समजणार नाही. ब्लू टिक बंद करण्यासाठी फॉलो करा या टिप्स
  1. तुम्हाला जर ब्लू टिक बंद करायची असेल तर सर्वात प्रथम व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंग्समध्ये जा.
  2. सेटिंग्समध्ये झाल्यावर Account वर क्लिक करा.
  3. त्यानंतर Privacy मध्ये गेल्यावर पर्याय दिसेल.
  4. Read Receipts हा पर्याय बंद केल्यानंतर तुम्ही मेसेज वाचले आहेत, हे समोरील व्यक्तीला समजणार नाही. मात्र, या ट्रिकचा वापर केल्यास तुमचे मेसेज समोरील व्यक्तीने वाचले आहेत की नाही, हे देखील तुम्हाला समजणार नाही.
वाचा : ही ट्रिक फॉलो करून लपवू शकता मेसेज वाचला की नाही
  1. तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज आला तर सर्वात प्रथम फोनला फ्लाइट मोडवर टाका.
  2. यानंतर व्हॉट्सअ‍ॅप मेसेज उघडा व वाचा.
  3. यानंतर फ्लाइट मोड डिसेबल करा.
  4. असे केल्याने तुम्ही मेसेज वाचला आहे हे समोरील व्यक्तीला समजणार नाही.
वाचा : वाचा : वाचा :


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bugv2P