मुंबई: दाक्षिणात्य अभिनेता याने कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याचा गंभीर आरोप काही दिवसांपूर्वी केला होता. त्याबाबत त्याने सोशल मीडियावर सविस्तर पोस्टही शेअर केली होती. यानंतर तामिळनाडू पोलिसांनी सिद्धार्थला संरक्षण देत असल्याचे जाहीर केले होते. परंतु सिद्धार्थने सध्याच्या परिस्थितीचा विचार करून पोलीस संरक्षण घेण्यास नकार दिला आहे. सिद्धार्थने पोलीस संरक्षण नाकारत असल्याची पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. यासोबतच तामिळनाडू पोलिसांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानत सिद्धार्थने लिहिले की, 'संरक्षण दिल्याबद्दल तामिळनाडू पोलिसांचे मनापासून आभार. माझ्या कुटुंबातील मी पहिली व्यक्ती आहे की ज्याला पोलिसांनी संरक्षण दिले आहे. परंतु अतिशय विनम्रपणे मी हे संरक्षण नाकारत आहे. जेणेकरून या करोनाच्या संकटकाळात या अधिकाऱ्यांचा वेळेचा सदुपयोग अन्य कोणत्या चांगल्या कारणासाठी होऊ शकेल. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आभार.' दरम्यान, गुरुवारी सिद्धार्थने ट्वीट करत त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना भाजपाकडून खून आणि बलात्काराच्या धमक्या येत असल्याचे सांगितले होते. 'भाजपच्या आयटी सेलमधील कार्यकर्त्याने माझा फोन नंबर लीक केला आहे. त्यामुळे गेल्या २४ तासात मला आणि माझ्या परिवाराला ५०० हून अधिक बलात्काराच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या आल्या आहेत. सगळे नंबर त्यांच्या भाजपा कनेक्शन आणि डीपीसहीत मी रेकॉर्ड करुन ठेवले आहेत आणि आता ते पोलिसांकडे देत आहे. मी शांत बसणार नाही. तुम्ही प्रयत्न करत राहा' असे त्याने ट्वीटमध्ये म्हटले होते. दरम्यान, या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3eFsDPq